नववर्षाचे गिफ्ट! मुंबईपाठोपाठ पुण्यातही धावणार डबल डेकर बस?

129

नववर्षात पुणेकरांच्या सेवेत डबल डेकर बस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. पीएमपीएमएलच्या ताफ्यात नववर्षात डबल डेकर बस दाखल होऊ शकते. याबाबत नुकतीच बैठक घेण्यात आली. पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरीया यांनी याबाबत माहिती दिली आहे.

डबल डेकर बसचे विशेष आकर्षण

पुण्याहून मुंबईत आलेले नागरिकांना येथील डबल डेकर बसचे विशेष आकर्षण असते. नागरिकांची उत्सुकता लक्षात घेत पुण्यात नववर्षात डबल डेकर बस सुरू होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात प्राथमिक चर्चा करण्यात आली आहे. या बसेस पुण्यासह, पिंपरी चिंचवडमध्ये किती यशस्वी होतील याबाबत अहवाल तयार केला जाणार आहे असे बकोरिया यांनी स्पष्ट केले आहे.

( हेही वाचा : केंद्र सरकारच्या PMGKAY योजनेत मोठा बदल! कोणाला मिळणार मोफत अन्नधान्याचा लाभ? )

पीएमपीएमएलकडून २०१८ मध्ये ई-बस सुरू करण्यात आली होती. त्यानंतर या बसला चांगला प्रतिसाद मिळाला. आता पुणेकर ई-बसने दररोज प्रवास करतात. या ई-बसेससाठी चार्जिंग स्टेशनची संख्याही वाढवण्यात आली आहे. तसेच कास पठार फिरायला येणाऱ्या नागरिकांसाठी ई-बसचे लोकार्पण करण्यात आले. यानंतर आता पीएमपीएमएलकडून डबल डेकर बसबाबत अभ्यास सुरू आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.