विमानात दोन प्रवाशांमध्ये तुंबळ हाणामारी, घटनेचा व्हिडिओ व्हायरल…

65

अलिकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून भांडण, हाणामारीच्या घटनांचे व्हिडिओ लगेच व्हायरल होतात. मध्यंतरीच एअर इंडिगोची हवाई सुंदरी आणि प्रवाशामध्ये बाचाबाची झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता पुन्हा एकदा ट्विटरवर विमानात दोन प्रवाशांमध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हे भांडण केवळ शाब्दिक नसून यात दोन भारतीयांनी चक्क हाणामारी सुरू केली.

( हेही वाचा : केंद्र सरकारच्या PMGKAY योजनेत मोठा बदल! कोणाला मिळणार मोफत अन्नधान्याचा लाभ?)

मिळालेल्या माहितीनुसार हे विमान बॅंकॉकवरून कोलकाताच्या दिशेने प्रवासासाठी रवाना होत होते, या दरम्यान हे भांडण झाले होते. यामध्ये दोन पुरूष प्रवासी आधी एकमेकांशी वाद घालत होते त्यानंतर एक फ्लाइट अटेंडंट परिस्थिती सांभाळून घेण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत होती यानंतरही हे भांडण थांबले नाही.

शाब्दिक भांडणानंतर दोन प्रवाशांमध्ये हाणामारी 

शाब्दिक भांडण सुरू असताना एका प्रवाशाने दुसऱ्याला ‘हाथ नीचे कर’ म्हणत धमकावायला सुरूवात केली. सहप्रवासी आणि केबिन क्रू भांडण थांबवण्याचा प्रयत्न करण्याआधीच हा वाद मारामारीत बदलतो. यानंतर भांडणात एकजण स्वत:चा चष्मा काढतो आणि दुसऱ्याला मारायला सुरूवात करतो. यानंचर दोघांमध्ये हाणामारी सुरू होते. असे या व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

सध्या हा घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या महिन्याच्या सुरूवातीला सुद्धा इंडिगो विमानातील भांडणाचा व्हिडिओ व्हायल झाला होता. हवाई सुंदरीने मी तुमची नोकर नाही असे म्हणत प्रवाशाला सुनावले होते यानंतर या हवाई सुंदरीचे नेटकऱ्यांनी कौतुक केले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.