
प्रतिनिधी
मुंबईची दुसरी लाइफलाईन म्हणून ओळखली जाणारी बेस्ट बस सेवा(BEST Bus Strike)मध्यरात्रीपासून पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. बेस्ट कृती समितीने पुकारलेल्या या ‘काम बंद’ आंदोलनामुळे सकाळच्या सत्रात घराबाहेर पडलेल्या नोकरदार आणि विद्यार्थी वर्गाचे प्रचंड हाल झाले आहेत. मुंबईतील गोरेगाव, ओशिवरा, वडाळा, मरोळ आणि कुर्ला यांसारख्या प्रमुख डेपोतून एकही बस बाहेर न पडल्याने रस्त्यांवर शुकशुकाट होता, तर रेल्वे स्थानके आणि टॅक्सी स्टँड्सवर प्रवाशांची तुफान गर्दी उसळली आहे.(BEST Bus Strike)
(हेही वाचा – Rural Roads : ग्रामीण विकासाला मिळणार चालना; आर्थिक वर्षात रस्ते पूर्ण करण्याचे लक्ष्य )
या संपामुळे कर्मचारी संघटनांमध्ये उभी फूट पडल्याचेही दिसून येत आहे. शशांक राव यांची ‘बेस्ट वर्कर्स युनियन’ आणि प्रसाद लाड यांची संघटना या संपात सहभागी झालेली नाही. मात्र, कृती समितीने महानगरपालिकेत विलीनीकरण, प्रलंबित वेतन करार, रिक्त पदांची भरती, कंत्राटी कामगारांना समान वेतन आणि ‘वेट लीज’ बस पद्धती बंद करणे यांसारख्या आठ प्रमुख मागण्यांसाठी हा एल्गार पुकारला आहे.(BEST Bus Strike)
विशेष म्हणजे, राज्य सरकारने ‘मेस्मा’ (महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा अधिनियम २०२३) लागू करून हा संप बेकायदेशीर असल्याचे जाहीर केले आहे. अत्यावश्यक सेवांमध्ये अडथळा आणल्यास किंवा तोडफोड केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा प्रशासन आणि मुंबई पोलिसांनी दिला आहे. कामावर येऊ इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांना रोखल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. एका बाजूला मागण्यांसाठी ठाम असलेली कृती समिती आणि दुसऱ्या बाजूला प्रशासनाचा ‘मेस्मा’चा बडगा यामुळे मुंबईतील वाहतुकीचे चक्र पूर्णपणे कोलमडले असून, यावर मार्ग कधी निघणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(BEST Bus Strike)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
