Best Birthday Wishes For Wife In Marathi: पत्नीला वाढदिवसाच्या दिवशी पाठवा ‘हे’ शुभेच्छा संदेश!

89
Best Birthday Ishes For Wife In Marathi: पत्नीला वाढदिवसाच्या दिवशी पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश!

वाढदिवस म्हणजे नातेसंबंध जपण्याचा, आनंदाचे क्षण साजरे करण्याचा महत्त्वाचा दिवस. पत्नी ही लाईफ पार्टनर, जीवनातील जोडीदार असते शिवाय ती तुमची सर्वात चांगली मैत्रीण असते. तिच्याकडे तुम्ही तुमची गुपिते शेअर करता. प्रिय पत्नीचा वाढदिवस साजरा करणे त्याकरिता ह्रदयस्पर्शी शुभेच्छा कशा द्याव्यात? याविषयी काही शुभेच्छा संदेश जाणून घेऊया. (Best Birthday Ishes For Wife In Marathi)

प्रेमाला भाषेचे कोणतेही अडथळे येत नाहीत हे आपल्याला चांगलेच ठाऊक आहे. तरीही काही सोप्या ओळींमध्ये प्रेम आणि आपुलकी व्यक्त करणे हे पत्नीच्या वाढदिवसाच्या दिवशी महत्त्वाचे असते. यामुळे तिचा दिवस तुम्ही खास बनवू शकता. सुंदर सुंदर शब्द जोडून आपली भावना व्यक्त करता येऊ शकते. चला, तर मग खास दिवशी प्रेम व्यक्त करणाऱ्या शुभेच्छा पत्नीला देऊन तिचा वाढदिवस प्रेमाने उजळून टाकूया.

(हेही वाचा – Lilva Kachori : घरबसल्या कशी बनवाल स्वादिष्ट कचोरी ? )

१. तुमच्या खास दिवशी तुम्हाला विश्वातील सर्व प्रेम पाठवत आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझ्या प्रिय!

२. प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

३. माझ्या दिवसातील सर्वोत्तम भाग म्हणजे तुझ्यासोबत घालवलेले वेळा. तुझा वाढदिवस तुझ्यासारखाच नेत्रदीपक असेल. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

४. माझ्या घराला घरपण आणणारी
आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने
घराला स्वर्गाहून सुंदर बनवणाऱ्या
माझ्या प्रेमळ पत्नीस
वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

५. मी खूप भाग्यवान आहे
कारण मला तुझ्यासारखी
कष्टाळू, प्रेमळ आणि मनमिळावू
सहचारिणी मिळाली
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!

६. चेहऱ्यावरील आनंद तुझ्या
कधीच जायला नको
तुझ्या डोळ्यात अश्रू
कधीच यायला नको
आनंदाचा झरा सदैव
तुझ्या आयुष्यात वाहत राहो
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !!!

७. मी खवळलेला महासागर, तू शांत किनारा आहेस,
मी उमलणापे फुल तर तू त्यातला सुगंध आहेस,
मी एक देह तू त्यातला श्वास आहेस
बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

८. जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे…प्रेम
जगातील सर्वात सुंदर व्यक्ती म्हणजे… तू
जगातील सर्वात अविस्मरणीय दिवस म्हणजे… तुझा वाढदिवस
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

९. प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे निस्वार्थ भाव
प्रेम म्हणजे आपलेपण आणि प्रेम म्हणजे समजून घेणं
हे सर्व मला ज्या व्यक्तीने न सांगता शिकवलं
त्या माझ्या लाडक्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

१०. माझ्या आयुष्यात फुलाप्रमाणे सुगंध घेऊन येणाऱ्या
माझ्या गोड बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.