Maratha Reservation : बीडमध्ये जाळपोळ; आरोपींकडून वसूल होणार नुकसान भरपाई

91

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरु असताना बीडमध्ये या आंदोलनाला ३० ऑक्टोबर रोजी हिंसक वळण लागले. त्यामध्ये आमदार प्रकाश सोळुंके आणि संदीप क्षीरसागर यांचे घर पेटवून देण्यात आले. सोबतच माजलगाव नगरपरिषदेच्या इमारतीलादेखील आग लावण्यात आली. आंदोलनाला लागलेले हिंसक वळण आता आरोपींना महागात पडणार आहे. कारण यात नुकसान झालेले सुमारे 11 कोटी आरोपींकडून वसूल करण्यात येणार आहे.

आरोपींनी जर ही नुकसान भरपाई दिली नाही, तर त्यांची वैयक्तिक मालमत्ता जप्त करून वसुली करण्यात येणार आहे, अशी माहिती बीडचे जिल्हा (Beed Police) पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली. बीडमध्ये हिंसाचार आणि जाळपोळ करणाऱ्या 144 आरोपींना अटक तर दोन हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांकडून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) प्रश्नावरून बीडमध्ये दगडफेक आणि जाळपोळ करणाऱ्या 144 आरोपींना बीड पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. तर, 500 हून अधिक जणांची चौकशी या प्रकरणात पोलिसांनी केली आहे. तर 2 हजार जणांवर या प्रकरणी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे.

(हेही वाचा PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी गरीब जनतेसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा)

बीड शहरातील बस स्थानकावर उभ्या असलेल्या अनेक बसेसची तोडफोड करण्यात आली होती. जमावाने फोडलेल्या 61 बसेसच्या काचा बसवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. यासाठी वीस लाखांच्या काचा हिमाचल प्रदेशमधून मागवण्यात आल्या आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बसेचीच मागणी पाहता तत्काळ दुरुस्तीचे कामे हाती घेण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.