सावधान! २६ मेपर्यंत राहणार कोरोनाची दुसरी लाट! 

६ नोव्हेंबर २०२० च्या तुलनेत २५ मार्च रोजीची कोरोना रुग्ण संख्या मोठी आहे. दुसऱ्या कोरोना लाटेत महाराष्ट्र आणि पंजाब या राज्यांची परिस्थिती अत्यंत वाईट असणार आहे.

95

कोरोनाचा प्रादुर्भाव देशात दिवसागणिक वाढत आहे. त्यात महाराष्ट्र आणि पंजाब या राज्यांत भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. १५ फेब्रुवार २०२१ या दिवसापासून सुरु झालेली कोरोनाची दुसरी लाट ही २६ मे २०२१ पर्यंत राहणार आहे. १०० दिवसांची ही लाट असणार आहे. तसा अहवाल एसबीआयचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. सोमय्या कांती घोष यांनी दिला आहे.

मागील २४ तासांत भारतात ५३ हजार ४७६ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. ६ नोव्हेंबर २०२० पासून ही संख्या मोठी आहे. दुसऱ्या कोरोना लाटेत महाराष्ट्र आणि पंजाब या राज्यांची परिस्थिती अत्यंत वाईट असणार आहे.

एप्रिल महिन्यात उच्चांक गाठणार!

या अहवालात दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा जास्त मोठी असणार आहे. मात्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे भारत या लाटेचा सक्षमपणे सामना करेल, असे या अहवालात म्हटले आहे.

(हेही वाचा : वाधवान बंधूंचा १४००० कोटींचा गृहकर्ज घोटाळा! सीबीआयने केला पर्दाफाश!)

लॉकडाऊन पर्याय नाही, लसीकरण हाच पर्याय! 

सध्या ज्या वेगात कोरोना पसरत आहे, हे पाहता पुन्हा एकदा मागील वर्षाप्रमाणे लॉकडाऊन लावण्यात येईल, अशी भीती व्यक्त होत होती. मात्र या अहवालानुसार, लॉकडाऊन किंवा निर्बंध हे कोरोना थांबवण्यासाठी तितके परिणामकारक उपाय ठरणार नाहीत, त्यासाठी लसीकरण हा परिणामकारक पर्याय आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

मुंबईत ४ एप्रिलपर्यंत ३ लाख कोरोना रुग्ण! 

महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने अहवाल दिला आहे, ज्यात ४ एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात ३ लाख ७ हजार ८६८ ऍक्टिव्ह रुग्ण असतील. तर एकूण १ हजार मृत्यू होतील. त्यामुळे एकूण मृतांची संख्या ६४ हजार ६१३ होईल. पुढील ११ दिवसांत ६४ हजार रुग्ण संख्या पोहचेल, या दुसऱ्या लाटेत नागपूर आणि ठाणे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडून पडेल, अशी भीती या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.