BDD Chawl Redevelopment : भाडेकरु तथा रहिवाशांच्या पात्रता निश्चितीच्या कामाला वेग, म्हाडाच्या उपाध्यक्षांनी घेतला कामाचा आढावा

मुंबईतील वरळी, नायगाव व ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पास म्हाडाचे उपाध्यक्ष व सीईओ संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी भेट देऊन पहिल्या टप्प्यातील बांधकामाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.

235
BDD Chawl Redevelopment : भाडेकरु तथा रहिवाशांच्या पात्रता निश्चितीच्या कामाला वेग, म्हाडाच्या उपाध्यक्षांनी घेतला कामाचा आढावा
BDD Chawl Redevelopment : भाडेकरु तथा रहिवाशांच्या पात्रता निश्चितीच्या कामाला वेग, म्हाडाच्या उपाध्यक्षांनी घेतला कामाचा आढावा

राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत स्थानिक भाडेकरू तथा रहिवाशांच्या पात्रता निश्चिती प्रक्रियेविषयीही महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी माहिती घेतली असून, या पात्रता निश्चितीच्या कामास वेग येण्याकरिता संबंधित उपजिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून विषय तडीस नेण्याकरिता योग्य पाठपुरावा करावा, असे निर्देश त्यांनी याप्रसंगी संबंधित अधिकार्‍यांना दिले. (BDD Chawl Redevelopment)

मुंबईतील वरळी, नायगाव व ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पास म्हाडाचे उपाध्यक्ष व सीईओ संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी भेट देऊन पहिल्या टप्प्यातील बांधकामाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. तीनही प्रकल्पांतील पहिल्या टप्प्यांतर्गत उभारण्यात येणार्‍या इमारतींची त्यांनी पाहणी केली. राज्य शासनाचा या अत्यंत महत्वाकांक्षी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प सन २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी गुरुवारी संबंधित अधिकार्‍यांना दिले. तसेच त्याकरिता दुसर्‍या टप्प्यातील बांधकाम त्वरित सुरू करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले. तसेच पहिल्या टप्प्यांतील बांधकामाच्या प्रगतीबद्दल समाधानकारक व्यक्त करत त्यांनी पुनर्वसन सदनिकांची उभारणी प्राधान्याने करण्याचेही आदेश संबंधित अधिकार्‍यांना दिले. याप्रसंगी प्रकल्पस्थळी उभारण्यात आलेल्या नमूना सदनिकांचीही त्यांनी पाहणी केली. (BDD Chawl Redevelopment)

New Project 2023 10 12T205630.709

(हेही वाचा – C. D. Barfiwala Road, Juhu-Versova Road : सी. डी. बर्फीवाला रोड ते जुहू-वर्सोवा रोडवर मेट्रोच्या खालून नवीन पुलाची चाचपणी)

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेता हा प्रकल्प देशातील नागरी पुनरुत्थानाचा सर्वात मोठा प्रकल्प आहे. मुंबईतील मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या वरळी, नायगाव व ना. म. जोशी मार्ग येथे उभारण्यात येत असलेला बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प सुमारे ९२ एकर जागेवर उभारण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत स्थानिक भाडेकरू तथा रहिवाशांना ५०० चौरस फुट चटई क्षेत्रफळाची अत्याधुनिक सदनिका विनामूल्य देण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत वरळी येथे ९६८९ पुनर्वसन सदनिका उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. (BDD Chawl Redevelopment)

सुधारित आराखड्यानुसार टप्पा क्रमांक १ मध्ये पुनर्वसन इमारत क्रमांक १ मधील ८ विंगचे काम व इमारत क्रमांक ६ मधील ६ पैकी २ विंगचे काम प्रगतीपथावर आहे. नायगाव येथे ३३४४ पुनर्वसन सदनिकांचे नियोजन असून पहिल्या टप्प्यातील ८ पुनर्वसन इमारतींपैकी ५ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू आहे. ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत २५६० पुनर्वसन सदनिकांची निर्मिती करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यांतर्गत एकूण ७ विंगपैकी ४ विंगच्या बेसमेंटचे काम प्रगतीपथावर आहे. (BDD Chawl Redevelopment)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.