Ashish Shelar : ‘उबाठा’ सेनेवाले नुसते शंकाखोर नव्हे, तर शंखासूर; आशिष शेलार यांचा टोला

छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागणारे हे 'उबाठा' सेनेवाले नुसते शंकाखोर नव्हे, तर शंखासूर आहेत, असा घणाघात भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केला.

120
Ashish Shelar : 'उबाठा' सेनेवाले नुसते शंकाखोर नव्हे, तर शंखासूर; आशिष शेलार यांचा टोला
Ashish Shelar : 'उबाठा' सेनेवाले नुसते शंकाखोर नव्हे, तर शंखासूर; आशिष शेलार यांचा टोला

शिवरायांची वाघनखे लंडनहून परत आणण्यासाठी आमच्या सरकारने प्रामाणिक प्रयत्न केला. त्यामुळे पोटशुळ उठलेल्या ‘उबाठा’ सेनेने या वाघनखांवरच शंका उपस्थित केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेल्या वाघनखांबाबत आदित्य ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांचे हे विधान तत्कालीक नाही, तर ते एक षड्यंत्र आहे. छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागणारे हे ‘उबाठा’ सेनेवाले नुसते शंकाखोर नव्हे, तर शंखासूर आहेत, असा घणाघात भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केला. (Ashish Shelar)

दादर (प.) येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात मुंबई भाजपाच्या वतीने आयोजित ‘शंकेखोरांचा कोथळा बाहेर काढणारच-वाघ नखांच्या निमित्ताने’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर, प्रसाद लाड, अभिनेते डॉ. राहुल सोलापूरकर, गायक नंदेश उमप, महामंत्री संजय उपाध्याय व्यासपीठावर उपस्थित होते. शेलार म्हणाले, ज्यांना छत्रपतींच्या नावाने फक्त घोषणा द्यायच्या आहेत, त्यांना वाघ नखांबाबत शंका वाटण्यात काही नवीन नाही. आपल्या नावाशी आणि पक्षाशी प्रतारणा करणाऱ्याबाबत काय बोलायचे, असा सवाल करत प्रबोधनकारांनी त्यांना हे नाव का दिले ते त्यांना वाचता आलं असतं तर त्यांनी अशी शंका घेतलीच नसती, अश्या शब्दांत अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी वाघ नखांबाबत शंका घेणाऱ्यांना सडेतोड जवाब दिला. (Ashish Shelar)

वीर सावरकरांचा अवमान करणाऱ्यांशी ‘उबाठा’ सेनेची दोस्ती

शंकासुरांच्या विचारांचा कोथळा काढणे गरजेचे आहे. वाघनखांच्या बाबतीतील निर्णयाबद्दल महायुती सरकारचे अभिनंदन केले पाहिजे. महायुती सरकार महाराष्ट्रातील जनतेला शौर्याचे प्रतीक असलेल्या वाघनखांचे दर्शन घडावे यासाठी प्रयत्न करत आहे. करार झाला. वाघनखे कधी येतील याची तारीख ठरल्यावर आदित्य ठाकरे यांनी वाघनखांबद्दल शंका उपस्थित केली. हे षडयंत्र आहे. महाराष्ट्रातील जनता हे पाहत आहे. छत्रपतींच्या वंशजाकडे पुरावा मागणारे लोक उबाठा गटातील होते. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाची गादी प्रिय झाली. त्यांनी छत्रपतींच्या वंशजाकडे पुरावे मागितले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसशी उद्धव ठाकरे यांनी हात मिळवणी केली. उद्धव ठाकरे यांच्या सरकारने सावरकरांची जयंती मंत्रालयात साजरी करण्याची परवानगी नाकारली. ते बदनामी करणाऱ्यांच्या संगतीत जाऊन बसले. महेक प्रभू काश्मिरच्या विरोधात फलक घेऊन घोषणा देताना तिच्यावर साधी कारवाई झाली नाही. आता आदित्य ठाकरे वाघ नखांवर शंका घेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू होणारी प्रत्येक गोष्ट आम्हाला वंदनीय आहे. हे शंकासुर आहेत. महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत विचारधारा पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे, असेही आशिष शेलार म्हणाले. (Ashish Shelar)

(हेही वाचा – ED Seized MLA Property : शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांची दीडशे कोटींची संपत्ती जप्त)

लंडनमध्ये शिवरायांची युद्धनीती अभ्यासक्रमात – राहुल सोलापूरकर

अभिनेते राहुल सोलापूरकर म्हणाले, ग्रँट डफकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधातील सर्व गोष्टी संग्रहालयाला दिल्या गेल्या. त्याबाबत पुरावे उपलब्ध आहेत. तत्कालीन कागदपत्रांमध्ये ही वाघनखे अफजलखानाला मारण्यासाठी वापरली गेली याचे पुरावे आहेत. शिवाजी महाराजांच्या डाव्या ती हातातील घातली होती याचा उल्लेख ही सापडतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी निगडित असलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला वंदनीय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात अहमदाबादमध्ये युद्धनीतीचा कोर्स सुरू झाला आहे. लंडनमध्ये युद्धनीतीच्या अभ्यासक्रमात अश्या गोष्टीचा उल्लेख आहे तो म्हणजे, शत्रूची मानसिकता ओळखत त्याला टप्प्यात आणून शस्त्राचा वापर न करता जवळ आणत शेवटी शस्त्र वापरून त्याचा निप्पात करायचा. या युद्धनीतीचा जगाच्या नकाशावर पहिला प्रयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. शिवाजी महाराजांची युद्धनीती आपल्याला कधी शिकवली गेली नाही. श्रीकृष्णाची राजनीति छत्रपती शिवाजी महाराजांनी व्यवहारांमध्ये वापरली. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची दोन चित्रे आहेत. जी औरंगजेबाच्या दरबारात फ्रेंच चित्रकाराने काढली होती असेही ते म्हणाले. (Ashish Shelar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.