Baramati : बारामतीत तरुणीचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

सहयोग सोसायटीच्या गेटवर तरुणीला मारहाण झाली आहे. बारामती शहरातील सहयोग सोसायटी येथे तरुणी मेहंदी काढण्यासाठी गेली होती.

154
Ajit Pawar : अजित पवार यांच्या बारामतीत तरूणीचा विनयभंग

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बारामतीमध्ये (Baramati) एका तरुणीचा विनयभंग झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांचे घर ज्या सोसायटीमध्ये आहे त्या सोसायटीच्या गेटवरच या तरुणीचा विनयभंग झाला आहे.

(हेही वाचा – America : मॉलमध्ये अंधाधुंद गोळीबार, ९ जण जागीच ठार)

माहितीनुसार, सहयोग सोसायटीच्या (Baramati) गेटवर तरुणीला मारहाण झाली आहे. बारामती शहरातील सहयोग सोसायटी येथे तरुणी मेहंदी काढण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी अरफाज सादिक आत्तार याने तरुणीचा विनयभंग केला आहे. तसेच तिला फरफटत घराबाहेर नेऊन तिला जखमी केल्याप्रकरणी बारामती शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही पहा – 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी सहयोग सोसायटी येथे मेहंदी काढण्यासाठी गेली होती. ज्या घरात (Baramati) मेहंदी काढण्यासाठी गेली होती त्या घरात जाऊन आरोपीने फिर्यादीस बाहेर बोलून घेतले. त्यानंतर तू माझ्याबरोबर चल असे म्हणून तिचा डावा हात ओढून पकडून फरफटत ओढत बंगल्याच्या गेटच्या बाहेर नेऊन माझ्याशी लग्न कर असे सांगितले. त्यानंतर तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्या गालावरून हात फिरवून तू मला आवडते असे आरोपी म्हणाला. आरोपीने पीडितेचा विनयभंग करून तिला ढकलून खाली पाडून तिचे गुडघ्यास जखम करून तिला शिवीगाळ आणि दमदाटी केली.

बारामती शहर पोलिस ठाण्यात या गुन्हयाची नोंद करण्यात आली असून त्यांच्याकडून पुढील तपास सुरु आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.