Bamboo Wall : पूर्व द्रुतगती महामार्गावर बांबूची भिंत

या प्रकल्पांतर्गत ५ लाख बांबूच्या झाडांची लागवड केली जाणार आहे. या पाच लाख बांबूंचे वृक्षारोपण सुयोग्य ठिकाणांचा शोध घेऊन उद्यान खात्यामार्फत करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी स्पष्ट केले.

4972
Bamboo Wall : पूर्व द्रुतगती महामार्गावर बांबूची भिंत

मुंबई महापालिकेच्यावतीने आता पूर्व द्रुतगती महामार्गावर बांबूची भिंत (Bamboo Wall) उभारली जाणार आहे. या महामार्गालगत भांडूप ते कन्नमवार नगर पर्यंत दोन्ही बाजुला सहा किलोमीटर लांबीची बांबूची भिंत (Bamboo Wall) उभारली जाणार आहे. यासाठी तब्बल  ८१०० बांबूंचा वापर केला जाणार आहे. (Bamboo Wall)

मुंबई महापालिकेच्यावतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शहरी हरितीकरण प्रकल्प हाती घेतला जात असून या योजनेअंतर्गत मुंबईमध्ये अधिकाधिक बांबू वृक्षारोपण (Bamboo plantation) करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत ५ लाख बांबूच्या झाडांची लागवड (Bamboo plantation) केली जाणार आहे. या पाच लाख बांबूंचे वृक्षारोपण (Bamboo plantation) (Bamboo plantation) सुयोग्य ठिकाणांचा शोध घेऊन उद्यान खात्यामार्फत करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी स्पष्ट केले. (Bamboo Wall)

(हेही वाचा – Insurance : आता वैद्यकीय क्षेत्रात आता आयुर्वेद आणि होमिओपॅथीसाठीही विमा)

बांबूच्या सुमारे १६०० जाती

या प्रकल्पांतर्गत पूर्व द्रुतगती महामार्गा लगत भांडुप ते कन्नमवार नगर या तीन किलोमीटर अंतराच्या जागेत बांबूच्या झाडांची (Bamboo Wall) लागवड केली जाणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुला या परिसरात बांबू वृक्षारोपण (Bamboo plantation) केले जाणार आहे. तब्बल सहा किलोमीटर अंतराच्या जागेत या बांबूची झाडे लावली जाणार आहे. त्यामुळे या महामार्गालगत एकप्रकारे बांबूची वॉल (Bamboo Wall) तयार होणार आहे. ही वॉल (Bamboo Wall) सहा फुट रुंदीची असेल. बांबूच्या सुमारे १६०० जाती असून यासाठी शेतकरी नेते पाशा पटेल यांची मदत घेतली जाणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत या प्रकल्पांतर्गत पाच लाख बांबूची झाडे लावण्यात येणार असल्याचेही चहल (Iqbal Singh Chahal) यांनी स्पष्ट केले. (Bamboo Wall)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.