Ayodhya Ram Mandir : रेल्वेपाठोपाठ एसटी महामंडळाचा अयोध्यावारीसाठी पुढाकार

अयोध्येतील राममंदिराविषयी जगभरातील भाविकांमध्ये कुतूहल आहे. अयोध्यासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी प्रति किलोमीटर ५६ रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. त्यासाठी ५० भाविकांनी एकत्र येऊन समूह तयार करावा लागेल.

156
Ayodhya Ram Mandir : रेल्वेपाठोपाठ एसटी महामंडळाचा अयोध्यावारीसाठी पुढाकार

हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामाची अयोध्येत प्राणप्रतिष्ठा (Ayodhya Ram Mandir) झाली. त्यानंतर आतापर्यंत लाखो रामभक्तांनी दर्शन घेतले. रेल्वेने विविध राज्यांतून विशेष आस्था रेल्वे सुरू केली. त्याच धरतीवर आता महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने पुढाकार घेतला आहे. धुळे जिल्ह्यातून पहिली बस दर्शनासाठी सोडण्यात आली होती. त्याच धर्तीवर पुणे जिल्ह्यातून मागणीनुसार आणि भाविकांचा ५० जणांचा समूह असल्यास सोयीनुसार पाहिजे ती गाडी देण्यात येणार आहे.

(हेही वाचा – Rahul Gandhi : राहुल गांधींच्या सभेत चोरांची एन्ट्री, सभेसाठी आलेल्या अनेकांचे मोबाईल फोन्स लांबवले)

भाविकांसाठी प्रति किलोमीटर ५६ रुपये भाडे :

अयोध्येतील राममंदिराविषयी (Ayodhya Ram Mandir) जगभरातील भाविकांमध्ये कुतूहल आहे. अयोध्यासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी प्रति किलोमीटर ५६ रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. त्यासाठी ५० भाविकांनी एकत्र येऊन समूह तयार करावा लागेल. या प्रवासासाठी चांगल्या गाड्या देण्यात येतील. तसेच सोबत दोन चालकही असतील. या यात्रेदरम्यान तीन-चार मुक्काम होतील. आरामदायी प्रवासासाठी शिवशाही तर ज्यांना स्वस्तात प्रवास करायचा आहे, त्यांच्यासाठी मागणीप्रमाणे साधी लालपरी बसही देण्यात येईल. एसटी महामंडळाचा राज्यात व परराज्याशी प्रवासी वाहतुकीचा करार असलेल्या राज्यात एसटीची प्रवासी वाहतूक करताना परमिट काढण्याची गरज नाही. त्यामुळे अयाध्येला जाताना मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या दोन राज्यांतील वाहतूक परमिट काढावा लागतो. ते भाड्याच्या स्वरुपात प्रवाशांकडून (Ayodhya Ram Mandir) घेतले जाईल.

(हेही वाचा – Thane Drugs : ठाणे पोलिसांची मोठी कारवाई; २७ कोटींचा अमली पदार्थांचा माल जप्त)

स्थानिक आगारात संपर्क केल्यावर बस उपलब्ध :

याबाबत पुणे विभाग नियंत्रक प्रमोद नेहुर यांनी सांगितले की, पंढरपूर वारी, गणेशोत्सव अशा यात्रा-जत्राच्या काळात भाविकांना करारानुसार बस देण्यात येते. त्याच धर्तीवर एसटी महामंडळाने अयोध्येला एकत्रित जाणाऱ्यांसाठी बस सुविधा सुरू केली आहे. त्यासाठी किमान ४५ ते ५५ प्रवासी असावेत. स्थानिक आगारात संपर्क केल्यावर बस उपलब्ध होईल. (Ayodhya Ram Mandir)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.