Ayodhya Ram Mandir: रामलल्लाची दिवसातून ६ वेळा आरती, सहभागी होण्यासाठी काय कराल? वाचा सविस्तर…

राम मंदिरात प्रभु श्रीरामांची दिवसातून ६ वेळा आरती होणार आहे. सकाळी जागरण आरती होईल, तर सायंकाळी शयन आरती होईल.

138
Vishva Hindu Parishad: अयोध्येतील कार्यक्रमात देशभरातून ८ कोटी लोकांचा सहभाग
Vishva Hindu Parishad: अयोध्येतील कार्यक्रमात देशभरातून ८ कोटी लोकांचा सहभाग

अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली. अलौकिक अशा या सोहळ्यानंतर मंगळवारपासून प्रभु श्रीरामेच दर्शन सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे. मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) आतील नियमित पूजा आणि आरतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

राम मंदिरात प्रभु श्रीरामांची दिवसातून ६ वेळा आरती होणार आहे. सकाळी जागरण आरती होईल, तर सायंकाळी शयन आरती होईल. आरतीसाठी पास देण्यात येणार आहे. सर्वसामान्य भक्तांसाठी सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत दर्शनासाठी मंदिर खुलं ठेवण्यात येणार आहे. सकाळी साडेसात वाजता रामभक्तांना आतमध्ये प्रवेश मिळेल. दर्शनासाठी दोन भाग (स्लॉट) करण्यात आले आहेत. पहिल स्लॉट सकाळी साडेसात ते साडेअकरापर्यंत असेल, तर दुसरा स्लॉट दुपारी २ पासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत असणार आहे.

(हेही वाचा – Ayodhya Ram mandir : 15 किलो सोने, 18 हजार हिरे आणि पाचू… रामलल्लाचे दागिने बनवले केवळ 12 दिवसांत)

आरतीचे नियोजन कसे असेल?
– पहाटे ४ वाजता काकड आरती होईल. त्यानंतर साडेचार वाजता मंगल आरतीचं आयोजन केलं जाईल. या दोन्ही आरत्यांसाठी भक्तांना उपस्थित राहता येणार नाही.
-सकाळी ६.३० वाजता मुख्य आरती केली जाईल. या आरतीला रामभक्तांना उपस्थित राहता येईल. त्यासाठी एक दिवस आधी पास घ्यावा लागेल. सायंकाळी होणाऱ्या आरतीची वेळ ७ वाजता असेल. या आरतीसाठी दर्शनाच्या दिवशीच बुकिंग करता येईल.

ऑनलाईन बुकिंग कसे कराल?
आरतीत सामील होण्यासाठी भक्तांना ऑनलाइन आणि ऑफलाइन बुकिंग करण्यासाठी पास उपलब्ध करण्यात आले आहेत. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या www.srJbtkshetra.org या संकेतस्थळावरून ऑनलाइन पास मिळू शकेल, तर दर्शनासाठी भक्तांना कोणत्याही रजिस्ट्रेशनची गरज भासणार नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.