मध्य रेल्वे मार्गावर १० जुलैला आषाढी विशेष गाड्या

105

आषाढी यात्रेसाठी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेवर दिनांक १० जुलै २०२२ रोजी आषाढी एकादशीला पंढरपूर ते मिरज दरम्यान आषाढी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.

( हेही वाचा : आता बॅंकेच्या पासबुकवर लागणार १८ टक्के GST! कोणत्या वस्तू महागणार? वाचा यादी )

विशेष गाड्या 

  • गाडी क्रमांक 01147 ही विशेष ट्रेन पंढरपूर येथून दिनांक १० जुलै २०२२ रोजी १३.३५ वाजता सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी १६.५० वाजता पोहोचेल.
  • गाडी क्रमांक 01148 ही विशेष गाडी दिनांक १० जुलै २०२२ रोजी मिरज येथून १८.१५ वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे त्याच दिवशी २०.२५ वाजता पोहोचेल.

थांबे: सांगोला, जत रोड, ढालगाव, कवठेमहांकाळ, सुलगरे आणि आरग.

संरचना: ४ शयनयान, एक लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि १ जनरेटर व्हॅन.

  • गाडी क्रमांक 01149 विशेष पंढरपूर येथून दिनांक १० जुलै २०२२ रोजी ०४.०० वाजता सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी ०७.३० वाजता पोहोचेल.
  • गाडी क्रमांक 01150 विशेष गाडी दिनांक १० जुलै २०२२ रोजी मिरज येथून १८.४५ वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे त्याच दिवशी २१.४० वाजता पोहोचेल.

थांबे: सांगोला, जत रोड, ढालगाव, कवठेमहांकाळ, सुलगरे आणि आरग.

संरचना: २ शयनयान, २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह १६ सामान्य द्वितीय श्रेणी.

आरक्षण:

  • सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर विशेष शुल्कासह वरील विशेष गाड्यांचे बुकिंग आधीच सुरू आहे.
  • या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.