Paytm Crisis : पेटीएमच्या युपीआय उद्योगावरही गदा?

पेटीएमचे सर्व युपीआय व्यवहार हे पेटीएम पेमेंट्स बँकेच्या माध्यमातून होतात. 

184
Paytm Crisis : पेटीएम पेमेंट्स बँकेवरील कारवाईनंतर पेटीएम युपीआयची बाजारातील हिस्सेदारी आली ९ टक्क्यांवर
  • ऋजुता लुकतुके

पेटीएम कंपनीसमोर (Paytm Company) उभं असलेलं संकट वाटतं तितकं सोपं नाही, असंच आता समोर येत आहे. कारण, घडामोडी जवळून पाहिल्या तर येत्या २९ फेब्रुवारीपासून पेटीएमचे युपीआय व्यवहारही बंद होऊ शकतात. कारण, पेटीएमचे युपीआय व्यवहार हे शंभर टक्के पेटीएम पेमेंट्स बँकेच्या माध्यमातून होतात. आणि या बँकेला नवीन खाती, मुदतठेवी आणि ठेवी स्वीकारण्यास बंदी घालण्यात आली आहे. आणि या बँकेचा परवानाच मार्चपासून बंद होऊ शकतो. अशावेळी पेटीएमची युपीआय सेवा कंपनीला सुरू ठेवायची असेल तर रिझर्व्ह बँकेची मोठी मेहरबानी पेटीएमला लागणार आहे. (Paytm Crisis)

युपीआय व्यवहार घडवून आणण्यासाठी ही सेवा देणाऱ्या कंपनीकडे पेमेंट सर्व्हिस प्रोव्हाडर असावा लागतो. याला पीएसपी म्हणतात. पीएसपी ही एखादी बँकच असू शकते. आणि पेटीएमकडे (Paytm) एकमेव नोंदणीकृत पीएसपी आहे – ती म्हणजे पेटीएम पेमेंट्स बँक. पेटीएम कंपनीच्या (Paytm Company) एकूण ग्राहक व्यवहारांमध्ये युपीआय वापरून केलेले व्यवहार ७५ टक्के आहेत. म्हणूनच पेमेंट्स बँक जरी बंद पडली तरी कंपनीला युपीआय व्यवसाय सुरू ठेवण्याची आशा आहे. पण, त्यासाठी रिझर्व्ह बँकेनं पीएसपी बदलाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पेटीएमला सहकार्य करणं आवश्यक आहे. (Paytm Crisis)

(हेही वाचा – Amit Shah : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू केला जाईल)

हे आहेत भारतातील थर्ड पार्टी ॲप्लिकेशन प्रोव्हायडर

अर्थात, पेटीएम कंपनीला (Paytm Company) या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे. आणि त्यांनी रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शनाखाली यातून तोडगा काढू असं म्हटलं आहे. ‘पेटीएम पेमेंट्स बँके व्यतिरिक्त इतर बँकांचं व्यासपीठ वापरावं लागणार असेल तर त्यासाठीही रिझर्व्ह बँकेची परवानगी आवश्यकच आहे. त्यासाठी कुठलंही पुढचं पाऊल उचलण्यापूर्वी आम्ही रिझर्व्ह बँकेचंच मार्गदर्शन घेत आहोत. त्यांच्याबरोबर संवादाला आम्ही सुरुवात केली आहे. आणि यातून तोडगा निघेल अशीच आम्हाला आशा आहे,’ असं पेटीएम कंपनीचे (Paytm Company) सीओओ भावेश गुप्ता मीडियाशी बोलताना म्हणाले आहेत. (Paytm Crisis)

विशेष म्हणजे पेटीएम कंपनीकडे (Paytm Company) इतर बँकांसाठी आवश्यक ते करार करण्यासाठी लागणारी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशनची परवानगीही नाही. कारण, इतके दिवस पेटीएम पेमेंट्स बँकच पेटीएम युपीआयसाठी पीएसपी म्हणून काम करत होती. आणि पण, जर इतर बँकांशी करार करायचा झाला तर पेटीएमला थर्ड पार्टी ॲप्लिकेशन प्रोव्हायडर म्हणून काम करावं लागेल. सध्या त्यासाठी लागणारा परवाना त्यांच्याकडे नाही. गुगल पे, भारत पे हे भारतातील थर्ड पार्टी ॲप्लिकेशन प्रोव्हायडर आहेत. त्यांचा देशातील बँकांशी एनपीसीआयच्या परवानगीने तसा करार झाला आहे. पेटीएमला आता थर्ड पार्टी ॲप्लिकेशन प्रोव्हायडर (Third Party Application Providers) म्हणूनच काम करावं लागेल. आणि तसं झालं तर पेटीएमच्या सध्याच्या ग्राहकांना नव्याने सेवा घ्यावी लागेल. आणि त्यांचा पेटीएमवरील जुना डेटा पुसला जाईल. त्यामुळे काहीही केलं तरी पेटीएम समोरचं संकट इतकं सोपं नाहीए. (Paytm Crisis)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.