BEST ला आणखी ५०० कोटींचे अर्थसहाय्य

बेस्ट उपक्रमाला या आर्थिक वर्षांत ८०० कोटी रुपयांचा निधी महापालिकेच्यावतीने देण्यात येत असून या व्यतिरिक्त आता ५०० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. बेस्ट उपक्रमाच्या मागणीनुसार महापालिकेने ५०० कोटी रुपयांचा निधी बेस्टला देण्याचा निर्णय घेतला आहे.

7334
BEST ला आणखी ५०० कोटींचे अर्थसहाय्य
BEST ला आणखी ५०० कोटींचे अर्थसहाय्य
  • सचिन धानजी,मुंबई

बेस्ट (BEST) उपक्रमाला या आर्थिक वर्षांत ८०० कोटी रुपयांचा निधी महापालिकेच्यावतीने देण्यात येत असून या व्यतिरिक्त आता ५०० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. बेस्ट (BEST) उपक्रमाच्या मागणीनुसार महापालिकेने ५०० कोटी रुपयांचा निधी बेस्टला देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांमध्ये हा निधी बेस्टल अदा केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. बेस्टचे (BEST) महाव्यवस्थापकांनी काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून बेस्टला उपक्रमाला निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. या पत्रामध्ये बेस्ट महाव्यवस्थापकांनी (Best General Manager) बेस्ट उपक्रमांतर्गत परिवहन विभागास अंदाजे दरमहा १५० कोटी ते १८० कोटी रुपये इतकी आर्थिक तूट असल्याचे नमूद केले आहे. (BEST)

तर जुलै २०२३ पर्यंत एकूण आर्थिक तूट ७४४.९५ कोटी रुपये एवढी असल्याचे नमूद केले आहे. तसेच, महाराष्ट्र विक्री कर, वीज खरेदी, एमएसपीसी प्राधिकरणाची एफबीएसमची बिले, कर्जाची परतफेड, कंत्राटदारांची देणी, कर्मचाऱ्यांच्या देणी इत्यादी करीता अंदाजित ८८८४.२४ कोटी रुपये एवढा खर्च वाढले जाणार असून त्याचप्रमाणे टाटा पॉवर कंपनी लि. यांना सवलतीची बिले आणि अल्प मुदतीच्या कर्जाचे मासिक हफ्ते यांचा बेस्ट (BEST) उपक्रमास भरणा करण्याकरीता प्रत्येक महिन्याला सुमारे २१५ कोटी रुपये एवढ्या रकमेची आवश्यकता असते, असेही यापत्रात नमूद केले आहे. त्यामुळे बेस्ट (BEST) उपक्रमाचे कामकाज सुरळीतपणे पार पाडण्याकरीता ७४४.९५ कोटी रुपये एवढे अनुदान देण्याची विनंती महाव्यवस्थापकांनी केली आहे. त्यानुसार ८०० कोटी रुपयांच्या निधी व्यतिरिक्त ५०० कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून ही रक्कम देण्यासाठी विविध खात्यांसाठी केलेला निधी वळता करण्यात आला आहे. (BEST)

(हेही वाचा – Chandrakant Patil : राज्यात ४५ जागा नक्की जिंकणार, चंद्रकांत पाटील यांचा दावा)

या वर्षांत तरतूद रकमेतून आतापर्यंत ७८१ कोटींची रक्कम अदा

बेस्ट (BEST) उपक्रमाला अनुदान म्हणून सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये तरतूद करण्यात आलेल्या ८०० कोटी रुपयांच्या तरतुदीमधून सन २०२३-२४ मध्ये बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीकरीता सानुग्रह अनुदान देण्यासाठी.८० कोटी राखून ठेवण्यात आले आहे. तर उर्वरीत ७२० कोटी रुपयांच्या तरतूदीमधून एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ करीता प्रतिमहा ६० कोटी याप्रमाणे बेस्ट (BEST) उपक्रमाला अदा करण्यात येत आहेत. त्यानुसार ८०० कोटी इतक्या तरतूदीमधून आतापर्यंत ७८१.८०३५ कोटी एवढ्या रकमेचे अधिदान करण्यात आले आहे. त्यामुळे १८ कोटी १९ लाख ६५ हजार रुपये एवढीच रक्कम आता शिल्लक राहिलेली आहे. (BEST)

आतापर्यंत बेस्टला ८ हजार कोटींचे अनुदान अदा

सन २०१४-१५ पासून मुंबई महानगरपालिकेकडून (Mumbai Municipal Corporation) बेस्ट उपक्रमाला आर्थिक सहाय्य करण्यात येत आहे. सार्वजनिक वाहतूकीचे महत्व लक्षात घेऊन आणि बेस्ट (BEST) उपक्रमाची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन, सन २०१९-२० पासून ते सन २०२३-२४ मधील ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत करण्यात आलेल्या तरतूदींमधून ३४२५.३२ कोटी रुपये व तरतुदींव्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान रक्कम म्हणून ४६४३.८६ कोटी रुपये असे एकूण ८०६९.१८ कोटी एवढ्या रकमेचे अधिदान महापालिकेने बेस्टला केले आहे. (BEST)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.