SBI सह भारतातील 18 बँकांचे ग्राहक संकटात, व्हायरस करतोय बँक डिटेल्स चोरी! तुम्ही ही चूक केली नाही ना?

106

भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या एसबीआयसह 18 बँकेच्या ग्राहकांना धोक्याची सूचना देण्यात आली आहे. Drinik Android trojan व्हायरसचं एक नवीन व्हर्जन निदर्शनास आले असून हे व्हर्जन भारतातील मुख्य 18 बँकांना टार्गेट करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

व्हायरसचा अटॅक

या ट्रोजन व्हायरसच्या माध्यमातून ग्राहकांचा वैयक्तिक डेटा आणि बँकिंग क्रेडेन्शियल्स चोरी करण्यात येत आहेत. हा ट्रोजन व्हायरस भारतात 2016 पासून असून तो याआधी केवळ SMS चोरी करण्यासाठी केला जात होता. पण सप्टेंबर 2021 पासून यात बँकिंग ट्रोजन देखील जोडण्यात आला आहे. या व्हायरसने 27 बँकिंग संस्थांच्या युजर्सना लक्ष्य करत आहे. Drinik व्हायरसचं हे व्हर्जन युजर्सना फिशिंग पेजवर नेऊन त्यांचा डेटा चोरी करत आहे.

कसा होतो डेटा चोरी?

हा व्हायरस युजर्सच्या फोनमध्ये प्रवेश करुन स्क्रीन रेकॉर्डिंग,की-लॉगिंग,अॅक्सिसेबिलिटी सर्व्हिस आणि इतर डिटेल्स चोरी करण्यात येतात. याचं लेटेस्ट व्हर्जन iAssist नावाच्या अॅपसह येतं. अनेक युजर्स इंटरनेट डिपार्टमेंटचं टॅक्स मॅनेजमेंट टूल समजून डाऊनलोड करत आहेत. हे अॅप इन्स्टॉल केल्यानंतर हा व्हायरस मेसेज वाचणं,रिसीव्ह करणं आणि सेंड करण्यासाठी परवानगील मागतो. ग्राहकांनी या परवानग्या दिल्यानंतर ग्राहकांचा फोन हॅक केला जातो.

(हेही वाचाः महाराष्ट्रात सायबर इंटिलिजन्स युनिट उभारणार – फडणवीस)

फिशिंग पेज ओपन केल्यानंतर इनकम टॅक्स वेबसाईटचं पेज ओपन होतंय या पेजवर युजरने लॉग इन केल्यानंतर ग्रहकांचे सारे डिटेल्स स्क्रीन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून रेकॉर्ड करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.