Artificial Lake Immersion 2023 : कृत्रिम तलावांची संख्या वाढली तरीही मूर्ती विसर्जनाचा टक्का एवढाच

84
Artificial Lake Immersion 2023 : कृत्रिम तलावांची संख्या वाढली तरीही मूर्ती विसर्जनाचा टक्का एवढाच
Artificial Lake Immersion 2023 : कृत्रिम तलावांची संख्या वाढली तरीही मूर्ती विसर्जनाचा टक्का एवढाच

मुंबईत यंदा पर्यावरणपुरक गणपती बाप्पांचे विसर्जन पार पडले जावे यासाठी यंदा महापालिकेच्यावतीने तब्बल १९८ कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली. यासर्व कृत्रिम तलावांमध्ये मागील दहा दिवसांमध्ये एकूण ७२ हजार २४० मूर्तींचे विसर्जन पार पडले. मागील वर्षीच्या तुलनेत कृत्रिम तलावांत विसर्जन करण्यात आलेल्या गणेश मूर्तींच्या संख्येत तब्बल ८ हजार ४३६ मूर्तींने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ३६ कृत्रिम तलावांची भर पडली होती. त्यामुळे या वाढलेल्या ३६ कृत्रिम तलावांमुळे सरासरी सुमारे २३४ गणेश मूर्तींचे विसर्जन झाल्याचे आकडेवारींवरून स्पष्ट होते. मात्र, सन २०२१ मधील उत्सवात झालेल्या विसर्जनाच्या तुलनेत यंदाचा आकडा कमी झाल्याचेही दिसून आले आहे.

New Project 56 2

मागील मंगळवारी १९ सप्टेंबर रोजी आगमन झालेल्या श्री गणरायांना गुरुवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप देण्यात आला. त्यामुळे बाप्पांचे आगमन झाल्यापासून दीड दिवसांपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी महापालिकेच्यावतीने ६९ नैसर्गिक विसर्जन स्थळांसह एकूण १९८ ठिकाणी कृत्रिम तलावांच्या ठिकाणी व्यवस्था उपलब्ध करून करून दिली होती. या सर्व कृत्रिम तलावांच्या ठिकाणी मागील दहा दिवसांमध्ये घरगुती आणि सार्वजनिक अशाप्रकारे एकूण ७२ हजार २४० मूर्तींचे विसर्जन झाले. सातव्या दिवसांपर्यंत ६२ हजार ३३ मूर्तींचे विसर्जन झाले होते, तर अनंत चतुर्दशीच्या एकाच दिवशी १० हजार २०७ गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये पार पडले.

New Project 57 1

मात्र, मागील वर्षी म्हणजे सन २०२२च्या गणेशोत्सवात कृत्रिम तलावांमध्ये घरगुती तसेच सार्वजनिक अशाप्रकारे एकूण ६३ हजार ८०७ गणेश मूर्तींचे तर सन २०२१च्या गणेशोत्सवामध्ये ७५ हजार ८९० गणेश मूर्तींचे विसर्जन झाले होते. यंदा महापालिकेने प्रथम १९१ आणि गौरी गणपतीनंतर कृत्रिम तलावांची संख्या वाढवून १९८ एवढी केली. मागील वर्षी १६२ कृत्रिम तलावांची सुविधा देण्यात आली होती तर त्या आधी म्हणजे सन २०२१मध्ये १७३ कृत्रिम तलावे उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे १६२ कृत्रिम तलाव असताना ६३ हजार ८०७ गणेश मूर्तींचे विसर्जन पार पडले होते, तिथे १९८ कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर केवळ ७२ हजार २४० मूर्तींचे विसर्जन झाल्याने मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ०८ हजार ४३६ ने वाढले असले तरी एकूण विसर्जन झालेल्या मूर्तींच्या तुलनेत कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन झालेल्या मूर्ती विसर्जनाचे प्रमाण हे ३५ ते ३८ टक्के एवढेच असल्याचे आकडेवारींवरून स्पष्ट होत आहे. परंतु सन २०२१च्या गणेशोत्सवातील कृत्रिम तलावांमधील गणेश मूर्ती विसर्जनाची आकडेवारी पाहता त्यावेळी १७३ कृत्रिम तलावांमध्ये घरगुती व सार्वजनिक अशाप्रकारे एकूण ७५ हजार ८९० गणेश मूर्तींचे विसर्जन पार पडले होते, जो आकडा यंदा १९८ कृत्रिम तलावांची निर्मिती केल्यानंतरही गाठता आलेला नाही. त्यामुळे सन २०२१च्या तुलनेत १ हजार ७४६ मूर्तींचे विसर्जन कमी झाल्याचे दिसून येत आहे.

(हेही वाचा – Kidnapping Case : लालबागच्या राजाला नवस बोलता आला नाही म्हणून दीड महिन्याच्या मुलाचे अपहरण)

कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन झालेल्या सार्वजनिक आणि घरगुती गणेश मूर्तीची आकडेवारी

सन २०२३ : एकूण विसर्जन : ७४,१४४ (घरगुती : ७२, २४०, सार्वजनिक : १९०४)

सन २०२२ : एकूण विसर्जन : ६३,८०४ (घरगुती :६१९८५, सार्वजनिक : १८२२)

सन २०२१ : एकूण विसर्जन : ७५,८९० (घरगुती :७२३८८, सार्वजनिक : ३५०२)

सन २०२० : एकूण विसर्जन : ६८,११९ (घरगुती : ६४३८६, सार्वजनिक : ३७३३)

सन २०१९ : एकूण विसर्जन : ३३,२१७ (घरगुती : ३२,६२९, सार्वजनिक : ५८८)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.