Bmc budget 2024-25: प्रशासनाचे पुन्हा उल्लू बनाविंग

952
BMC : अखेर मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांची बदली, अभिजीत बांगर नवे अतिरिक्त आयुक्त
BMC : अखेर मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांची बदली, अभिजीत बांगर नवे अतिरिक्त आयुक्त
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात येत असलेल्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये लोकसहभाग असावा, यासाठी मुंबईतील नागरिकांनी आपल्या सूचना [email protected].in या ई मेलवर  २३ जानेवारी २०२४ पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे.  विशेष म्हणजे या अर्थसंकल्पीय (Bmc budget)अंदाज पत्रकाच्या कामाला ऑक्टोबर महिन्यापासून सुरुवात होते आणि याचे काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या २ ते ३ फेब्रुवारी रोजी मांडल्या जाणाऱ्या  अर्थसंकल्पात जनतेकडून २३ जानेवारी पर्यंत प्राप्त होणाऱ्या सूचना आणि शिफारशी यांची छाननी करून कधी त्यात अंतर्भूत   करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे मागील म्हणजे सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ज्या प्रकारे  लोकसहभाग दाखवण्यासाठी ज्या सूचना व शिफारशी प्राप्त झाल्या होत्या, त्यांना ज्या प्रकारे केराची टोपली दाखवली, तशीच टोपली आता दाखवणार तर नाही ना असा प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित होत आहे.
 सन २०२४-२५ या वर्षाकरीता मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय (Bmc budget) अंदाज तयार करण्याचे काम सुरु आहे.  हा अर्थसंकल्पीय अंदाज हे  ०५ फेब्रुवारी, २०२४ रोजी वा तत्पूर्वी सादर करणे बंधनकारक आहे. या अनुषंगाने,  ज्यांना अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने काही सूचना करावयाच्या असतील तर त्यांनी दिनांक २३ जानेवारी २०२४ पर्यंत ई-मेल आयडी [email protected].in यावर सदर सूचना पाठवाव्यात,असे आवाहन लोकसहभागाच्या दृष्टीने मुंबईतील नागरिकांना महापालिका प्रशासनाने केले आहे.
तसेच ज्या नागरिकांना लेखी सूचना पाठवावयाच्या असतील; त्यांनी  २३ जानेवारी २०२४ पर्यंत सायंकाळी ४ वाजेपर्यंत पोहोचेल, अशा बेताने त्यांच्या सूचना प्रमुख लेखापाल (वित्त) यांचे कार्यालय, चौथा मजला, विस्तारीत इमारत,
बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, महानगरपालिका मार्ग, फोर्ट, मुंबई – ४०० ००१. या पत्यावर पाठवाव्याचे आवाहन केले आहे.
मागील वर्षी प्रशासनाने अशाच प्रकारे  जनतेकडून विकास कामासंदर्भात सूचना तथा शिफारशी लेखी तसेच मेलद्वारे  मागवून घेतल्या होत्या. यातील काही शिफारशी स्वीकारण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी आपल्या पत्रकार परिषदेत सांगितले. परंतु या सूचना आणि शिफारशी  यानुसार कुठेच अमलात आणल्या नाही की त्यानुसार काम केले. यातील  बऱ्याच सूचना तथा शिफारशी या केराच्या टोपलीत गेल्या होत्या. विकास कामासह महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी खात्यांच्या कारभारासंदर्भात केलेल्या सूचना आणि शिफारशी यांचाही विचार करण्यात आला नाही.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.