अमरावतीवरून मुंबईसाठी हवाई वाहतुकीचा बुधवारी (१६ एप्रिल) रोजी शुभारंभ झाला. मात्र अमरावती-मुंबई-अमरावतीचे (Amravati-Mumbai Air fare) तिकीट भाडे मात्र अनेकांचा हिरमोड करणारे ठरू पाहत आहे. शुभारंभाची फ्लाईट बुधवारी उडाल्यानंतर नियमित पहिली फेरी शुक्रवारी (१८ एप्रिल या दिवशी) होणार आहे. अलायन्स एअरचे विमान दुपारी २.३० वाजता मुंबईवरून टेकऑफ झाल्यानंतर शंभर मिनिटांचा प्रवास करून ४.०५ मिनिटांनी अमरावती विमानतळावर पोहोचणार आहे. अवघ्या २५ मिनिटांत म्हणजेच ४.३५ वाजता ही फ्लाईट मुंबईसाठी उड्डाण भरणार आहे.
(हेही वाचा – निलंबित पोलिस अधिकारी Ranjit Kasle अखेर पोलिसांच्या ताब्यात)
अमरावती-मुंबई-अमरावती यापैकी एकेरी प्रवासाचे किमान भाडे २१०० रुपये व सर्व कर आकारून व अखेरच्या क्षणापर्यंत ते कमाल चार हजार रुपयांपर्यंत राहिल, अशी माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या (Maharashtra Airport Development Authority) उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक स्वाती पाण्डेय यांनी पत्रपरिषदेत दिली होती.मात्र तसे काहीही नाही.
अनेक इच्छूक मेक माय ट्रीप (Make my trip) अथवा अलायन्स एअर डॉट को, या संकेतस्थळावर तिकीटाच्या बुकींगबाबत भेटी देत आहेत. अलायन्स एअर डॉट को (Alliance Air.com) या संकेतस्थळावर अमरावती-मुंबई फ्लाईट नजिकच्या काही दिवसात फ्लाईट उपलब्धच नसल्याचे दिसत आहे तर मेक माय ट्रीप या संकेतस्थस्थळावर २३ एप्रिल रोजीचे एकीकडील भाडे ६८१० रुपये दर्शविले जात आहे. एकीकडे ५६०० रुपये कमितकमी भाडे दर्शविले जात आहे. सुपरफास्ट रेल्वेपेक्षा विमानभाडे स्वस्त असेल, ही अमरावतीकरांची अपेक्षा तूर्त फोल ठरली आहे. (Amaravati Airport)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community