Amalner Curfew : जळगावमधील अमळनेरमध्ये दगडफेक; तीन दिवस संचारबंदी लागू

नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये व शांतता राखावी, असे आवाहन देखील पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

160
Amalner Curfew : जळगावमधील अमळनेरमध्ये दगडफेक; तीन दिवस संचारबंदी लागू

राज्यात सध्या बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून तणावाची परिस्थती निर्माण होत आहे. अशातच अमळनेर (Amalner Curfew) शहरात देखील तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसांनी तीन दिवसांसाठी संचारबंदी लागू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर (Amalner Curfew) येथे काल म्हणजेच शुक्रवार ९ जून रोजी रात्री दोन गटात वाद झाला. त्यानंतर त्या दोन गटात हाणामारी होऊन दगडफेकही करण्यात आली. स्थानिक पोलिसांनी वेळीच कारवाई करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून शहरात शनिवार ते सोमवार या काळात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये व शांतता राखावी, असे आवाहन देखील पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

(हेही वाचा – Amit Shah : अमरनाथ यात्रेकरूंचे दर्शन सुलभपणे व्हावे हीच सरकारची प्राथमिकता – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह)

अमळनेर शहरातील (Amalner Curfew) जीनगर गल्ली, जुना पारधीवाडा आणि सराफ बाजार परिसरात रात्री अल्पवयीन मुलांच्या किरकोळ भांडणातून सामाजिक तेढ निर्माण होऊन दगडफेक झाली. त्यामुळे शहरात दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली. दोन गट परस्परांना भिडले. दुकानाची तोडफोड झाली. अनेक घरांवर दगडफेक झाली. या घटनेमुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

शहराची (Amalner Curfew) कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रात्री उशिरा जळगावहून जादा कुमक मागवण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर, सहाय्यक निरीक्षक राकेशसिंग परदेशी व पोलीस कर्मचार्‍यांनी धाव घेत उपद्रवींचा शोध सुरू केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.