Akhil Maharashtra Giryarohan Mahasangh: प्रजासत्ताक दिनी हिंदवी स्वराज्याची ३५० वर्षे गडकिल्ल्यांवर तिरंगा, भगवा ध्वज फडकवून साजरी

महाराष्ट्र व कर्नाटकातील विविध ३७३ गडकिल्ल्यांवर भारतीय तिरंगा व स्वराज्याची भगवी पताका अर्थात भगवा ध्वज फडकविण्याचा तसेच शिवप्रतिमा पूजनाचा उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला. 

2106
Akhil Maharashtra Giryarohan Mahasangh: प्रजासत्ताक दिनी हिंदवी स्वराज्याची ३५० वर्षे गडकिल्ल्यांवर तिरंगा, भगवा ध्वज फडकवून साजरी
Akhil Maharashtra Giryarohan Mahasangh: प्रजासत्ताक दिनी हिंदवी स्वराज्याची ३५० वर्षे गडकिल्ल्यांवर तिरंगा, भगवा ध्वज फडकवून साजरी

श्री शिव छत्रपतींचे हिंदवी स्वराज्य म्हणजे आपल्या सर्वांचा अभिमान. २०२३-२४ वर्ष हे हिंदवी स्वराज्याचे ३५०वे वर्ष. या निमित्ताने महाराष्ट्रातील गिर्यारोहण क्षेत्रातील शिखर संस्था असलेल्या ‘अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघा’च्या (Akhil Maharashtra Giryarohan Mahasangh) वतीने महाराष्ट्र व कर्नाटकातील विविध ३७३ गडकिल्ल्यांवर भारतीय तिरंगा व स्वराज्याची भगवी पताका अर्थात भगवा ध्वज फडकविण्याचा तसेच शिवप्रतिमा पूजनाचा उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला.  २६ जानेवारी २०२४ रोजी, भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

WhatsApp Image 2024 01 27 at 12.11.25 3

हा उपक्रम महाराष्ट्रातीलच नव्हे, तर जगभरातील शिवभक्तांसाठी खुला ठेवण्यात आला होता. यामध्ये महासंघाकडे नावनोंदणी करून आपल्या जिल्ह्यातील किल्ल्यावर जाऊन शिवप्रेमी या उपक्रमामध्ये सहभागी झाले होते तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटकातील एकूण १७७ संस्था सहभागी झाल्या होत्या. यातील किल्ले वसई मोहीम यांनी ३४, वायएचए कांदिवली यांनी १६, दुर्ग प्रतिष्ठान सांगली यांनी ११, डीएमए जळगाव आणि वाय झेड ट्रेकर्स यांनी प्रत्येकी १० किल्ल्यांची जबाबदारी यशस्वीरित्या पूर्ण केली.

WhatsApp Image 2024 01 27 at 12.11.24

 

१० हजारांहून अधिक शिवप्रेमींसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सहभाग…

हा उपक्रम अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या (All Maharashtra Climbing Federation) सर्व जिल्हा शाखा, गिर्यारोहण संस्था, शिवप्रेमी संस्था आणि कार्यकर्ते यांच्या सहभागातून यशस्वीरित्या संपन्न झाला. यासाठी किल्ल्यांनी वेगवेगळ्या विभागात विभागणी करून विभाग निहाय ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यात आली होती. १० हजारांहून अधिक शिवप्रेमींसह केंद्र आणि राज्य सरकारचे पुरातत्त्व खाते, स्थानिक पोलीस प्रशासन आणि इतर अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनीदेखील मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे, कार्यकारी अध्यक्ष ऋषिकेश यादव, सचिव डॉ. राहुल वारंगे, सहसचिव राहुल मेश्राम, खजिनदार दीपाली भोसले यांच्यासह तमाम पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी योगदान दिले.

WhatsApp Image 2024 01 27 at 12.11.25 2 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.