Ajit Pawar: भारतरत्न पुरस्काराबद्दल ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे अजित पवारांकडून अभिनंदन

128
Ajit Pawar: भारतरत्न पुरस्काराबद्दल ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे अजित पवारांकडून अभिनंदन
Ajit Pawar: भारतरत्न पुरस्काराबद्दल ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे अजित पवारांकडून अभिनंदन

भारतरत्न पुरस्काराबद्दल (Bharat Ratna award) ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अभिनंदन आहे. उत्कृष्ट संसदपटू, समाजकारणातील समर्पित नेतृत्व असणारे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांचे अभिनंदन करून गौरवोद्गार काढले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात भारताचे उपपंतप्रधान, गृहमंत्री म्हणून लालकृष्ण अडवाणी यांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. देशाच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या मुद्द्यांवर त्यांनी संसदेत बेधडक आणि ठामपणे आपली मते मांडली. देशाच्या सर्वसमावेशक विकासासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे. असेही म्हटले आहे.

(हेही वाचा – Ind vs Eng 2nd Test : इंग्लंड विरुद्धच्या द्विशतकानंतर यशस्वी सचिन, विनोद आणि रवी शास्त्रीच्या पंक्तीत)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.