Heavy Rain : पावसामुळे मुंबई आणि पुण्यातील हवेची गुणवत्ता सुधारली

175
Heavy Rain : पावसामुळे मुंबई आणि पुण्याच्या हवेची गुणवत्ता सुधारली

गेल्या तीन – चार दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर (Heavy Rain) वाढला आहे. त्यामुळेच हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढचे काही दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच आज (गुरुवार, २० जुलै) मुंबईत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

तसेच बुधवारी (१९ जुलै) झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) मुंबई आणि पुण्यातील हवेत कमालीची सुधारणा दिसून आली आहे. मुंबईत हवेचा दर्जा ३९ तर पुण्यात ४८ वर दिसून आला. दोन्ही शहरात हवेची गुणवत्ता समाधानकारक असल्याचा निष्कर्ष केंद्रीय पृथ्वी व विज्ञान खात्याच्या सफर या ऑनलाईन प्रणालीने नोंदवला आहे.

(हेही वाचा – Heavy Rain : मुंबईत नाले चांगले स्वच्छ झाले, अतिवृष्टीनंतरही पाणी तुंबले नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)

बुधवारी दिवसभर मुंबईत आणि पुण्यात पावसाचा जोर (Heavy Rain) दिसून आला. वाहतूक कोंडी आणि रस्त्यावर पाणी साचल्याने दैनंदिन वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. मात्र पावसाच्या संततधारेने मुंबई आणि पुण्यातील सूक्ष्म धूलिकण फारच कमी झाल्याचे दिसून आले. मुंबईत बोरिवली, मालाड, भांडूप, अंधेरी येथे सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण अनुक्रमे २५, ३५, १८, १६ प्रति क्युबिक मीटर नोंदवले गेले. माझगाव आणि कुलाब्यात सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण ५३ प्रति क्युबिक मीटर नोंदवले गेले.

पुण्यात लोहगाव, शिवाजीनगर, पाषाण, कात्रज, कोथरूड येथे सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण अनुक्रमे २३, ३०, १८ आणि २४ प्रति क्युबिक मीटरवर नोंदवले गेले. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आजदेखील पुण्यात अतिवृष्टीसाठी (Heavy Rain) रेड अलर्ट जारी केला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.