Beed Accident : अहमदनगर-अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर पिकअप-कंटेनरची समोर-समोर धडक; 5 जणांचा जागीच मृत्यू

अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

169
Truck-Eicher Accident: समृद्धी महामार्गावर ट्रक-आयशरचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी
Truck-Eicher Accident: समृद्धी महामार्गावर ट्रक-आयशरचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

अहमदनगर-अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर बीडमधील ससेवडी गावाजवळ कंटेनर आणि पिकअपची समोरासमोर जोरादार धडक झाली. या भीषण अपघातात 5 जण जागीच ठार झाले आहेत.

नेकनूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्रल्हाद सीताराम घरत (६३, रा. महाजनवाडी, ता. जि. बीड), नितीन प्रल्हाद घरत (४१, रा. महाजनवाडी ता. जि. बिड), विनोद लक्ष्मण सानप (४१, रा. वाघिरा, ता. पाटोदा, जि. बीड), अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.

(हेही वाचा – Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराची उभारणी विनासंकट होण्यासाठी वर्षभर यज्ञ)

या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, ससेवाडी गावाजवळ कंटेनर आणि पिकअपचा समोरासमोर अपघात झाला. या भीषण अपघातात दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. यामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मृत्यू झालेले नागरिक महाजनवाडी गावातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.