NCP : अजित पवार गटाचा स्वराज्य सप्ताह

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला चालना देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वखालील राष्ट्रवादी काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत येत्या १२ ते १९ फेब्रुवारी दरम्यान राज्यात स्वराज्य सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

209
NCP : अजित पवार गटाचा स्वराज्य सप्ताह
NCP : अजित पवार गटाचा स्वराज्य सप्ताह

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) तोंडावर पक्षाला चालना देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्या नेतृत्वखालील राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) औचित्य साधत येत्या १२ ते १९ फेब्रुवारी दरम्यान राज्यात स्वराज्य सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १२ फेब्रुवारीला गेटवे ऑफ इंडिया (Gateway of India) येथे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते या सप्ताहाचा शुभारंभ होईल तर समारोप किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी मंगळवारी (०६ फेब्रुवारी) दिली. (NCP)

महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमान हा राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) मूलमंत्र आहे. त्यानुसार पक्षाकडून पदाधिकार्‍यांना, कार्यकर्त्यांना आणि विविध आघाड्यांना शिवविचारांचे विविध कार्यक्रम देण्यात आले असून त्याचे राज्यभरात जिल्हा आणि तालुक्यासह गावपातळीवर आयोजन करण्यात आले आहे. शिवकालीन आणि इतिहासाने प्रेरीत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक स्थळाच्या ठिकाणी ‘स्वराज्य ज्योत’ आणि ‘स्वराज्य पताका’ नेण्यात येणार आहे. या ज्योतीचे आणि पताकांचे गावागावात स्वागत करुन त्याठिकाणी शिवचरित्रावर आधारीत प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जाणार आहेत, असे तटकरे (Sunil Tatkare) यांनी सांगितले. (NCP)

(हेही वाचा – Narendra Modi: ‘सपने नही हकिकत बुनते…’ गेल्या १० वर्षांतील मोदींच्या आश्वासनांवर आधारित फिल्म प्रदर्शित)

‘रयतेचे मेळावे’ करणार आयोजित 

‘स्वराज्य सप्ताहानिमित्ताने’ राज्यातील शिवप्रेरणा आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर, स्वाभिमान युवक, युवती, महिला, विद्यार्थी आणि पदाधिकार्‍यांच्या मनात बिंबवला जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) तयारीला लागला आहे. शिवकालीन चरित्र, शिवकालीन संस्कृती आणि शिवकालीन मर्दानी खेळ शिवजयंतीच्यानिमित्ताने रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे १९ फेब्रुवारी रोजी जागवले जाणार आहेत. या सप्ताहात छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पदस्पर्शाने ज्या ऐतिहासिक वास्तू आणि गडकिल्ले पावन झाले आहेत त्याठिकाणी ‘रयतेचे मेळावे’ देखील आयोजित करण्यात आले आहेत. याशिवाय गडकिल्ले संवर्धन, स्वच्छता, पर्यावरण रक्षण आणि महिलांचा आदर यावरदेखील विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून कार्यक्रमाच्या ठिकाणी ‘स्वराज्य शपथ’ घेतली जाणार असल्याचे तटकरे (Sunil Tatkare) यांनी सांगितले. (NCP)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.