Pandemic Disease X: कोरोनानंतर आता ‘या’ आजाराबाबत काळजी घ्या, शास्त्रज्ञांनी केले आवाहन

डिसीज एक्सवर लस तयार करण्याची प्रक्रिया शास्त्रज्ञांनी सुरू केली आहे

70
Pandemic Disease X: कोरोनानंतर आता 'डिसीज एक्स' आजाराबाबत काळजी घ्या, शास्त्रज्ञांनी केले आवाहन
Pandemic Disease X: कोरोनानंतर आता 'डिसीज एक्स' आजाराबाबत काळजी घ्या, शास्त्रज्ञांनी केले आवाहन

कोरोनाच्या जागतिक महामारीचा धोका अजूनही पुरेशा प्रमाणात टळलेला नाही. अशातच युके आणि युएससह अनेक देशांमध्ये एका नवीन आजाराने डोके वर काढले असून या आजाराबाबत काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.

‘डिसीज एक्स’, (Pandemic Disease X) असे या आजाराचे नाव आहे. युके व्हॅक्सिन टाक्सफोर्सचे अध्यक्ष डेम केट बिंघम यांनी याविषयी सांगितले की, हा आजार कोरोनापेक्षा ७ पट वेगाने पसरतो. आरोग्य एजन्सी आणि जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील (WHO) या आजाराविषयी लोकांना सावध केले आहे.

(हेही वाचा – Epidemic Diseases : वातावरणातील बदलामुळे मुंबईसह राज्यात साथींचं प्रमाण वाढलं, कोरोना रुग्णसंख्येतही वाढ )

या आजाराची लक्षणे लवकर दिसतात शिवाय हा विषाणू वेगाने पसरतो. त्यामुळे डिसीज एक्सवर लस तयार करण्याची प्रक्रिया शास्त्रज्ञांनी सुरू केली आहे. यामुळे रुग्णांना या आजारावर नियंत्रण मिळवता येईल. या आजाराबाबत २५ विषाणुंचा अभ्यास केला आहे. हवामानातील बदलामुळे अनेक आजार वेगाने पसरतात तसेच प्राण्यांशी वाढलेला संपर्क माणसांसाठी धोकादायक ठरू शकतो, अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.