आफताब तर निघाला तालिबानी जिहादी…

104

लव्ह जिहादच्या माध्यमातून आफताबने श्रद्धा वालकर हिची निर्घृण हत्या  शरीराचे ३५ तुकडे केले. अशा या आफताबची चक्रावून टाकणारी मानसिकता समोर आली आहे. कालपर्यंत पोलिसांच्या चौकशी पवैफल्यग्रस्त झालेला प्रेमी म्हणून स्वतःची ओळख करत रागाच्या भरात श्रद्धाचा खून केल्याचे आफताब सांगत होता, पण पॉलिग्राफी चाचणीत त्यांच्या तोंडून जी माहिती समोर आली, ती पाहता आफताब हा प्रशिक्षित जिहादी आहे का, असा संशय पोलिसांना आला आहे. तो म्हणाला की, मला खुशाल फाशी द्या, जन्नतमध्ये मला हूर मिळतील अर्थात स्वर्गात अप्सरा मिळतील.

२० हिंदू मुलींनाही फसवले 

अफताबच्या पॉलिग्राफ टेस्टमधून तो कट्टर इस्लामी जिहादी असल्याचा स्पष्टच खुलासा झाल्यानंतर आता दिल्ली पोलीस त्याची नार्को टेस्टही करणार आहेत. श्रद्धा वालकर हिची हत्या करून तिचे 35 तुकडे केल्याचा घटनेचा आफताब अमीन पूनावाला याला अजिबात पश्चाताप झालेला नाही. श्रद्धा बरोबर त्याचा लव्ह जिहाद सुरू असताना अन्य 20 हिंदू मुलींबरोबर देखील त्याचे संबंध होते. बंबल ॲपद्वारे त्याने या 20 हिंदू मुलींशी संबंध प्रस्थापित केले होते. श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्याने एका हिंदू मानसोपचार तज्ञ मुलीला देखील घरी आणले होते. श्रद्धाची अंगठी आफताबने त्या मुलीला भेट दिली होती. अशा किमान 20 हिंदू मुली त्याने आपल्या लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवल्या होत्या.

(हेही वाचा शी जिनपिंग सरकारच्या विरोधात चीनमध्ये असंतोष, विद्यार्थी रस्त्यावर उतरले)

कृत्याचा पश्चाताप नाही 

दिवसभराच्या चौकशी आणि पॉलिग्राफ टेस्टनंतर आफताब शांत झोपतो. त्याच्या समावेत कोठडीत ठेवलेल्या दोन कैद्यांशी थोड्या गप्पा मारतो. पण या सर्व कालावधीत त्याच्या चेहऱ्यावर कोणताही तणाव दिसत नाही किंवा त्याला श्रद्धाची हत्या केल्याचा पश्चाताप देखील होत नाही. श्रद्धाची हत्या करायचा निर्णय आफताबने मुंबईत असतानाच घेतला होता. त्याची माहिती देखील आफताबने पोलिसांना आधीच्या चौकशीत आणि नंतरच्या पॉलिग्राफ टेस्टमध्ये दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.