Actress Dr. Mugdha Karnik यांनी श्री विठ्ठल भक्तांविषयी केले वादग्रस्त वक्तव्य, तीव्र निषेध व्यक्त करत मंदिर समितीकडून सार्वजनिक माफीची मागणी

185
Actress Dr. Mugdha Karnik यांनी श्री विठ्ठल भक्तांविषयी केले वादग्रस्त वक्तव्य, तीव्र निषेध व्यक्त करत मंदिर समितीकडून सार्वजनिक माफीची मागणी
Actress Dr. Mugdha Karnik यांनी श्री विठ्ठल भक्तांविषयी केले वादग्रस्त वक्तव्य, तीव्र निषेध व्यक्त करत मंदिर समितीकडून सार्वजनिक माफीची मागणी

वारकरी (Warkari) संप्रदाय, संत परंपरा तसेच श्री विठ्ठल भक्तांविषयी पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात अभिनेत्री डॉ. मुग्धा कर्णिक (Actress Dr. Mugdha Karnik) यांनी वादग्रस्त वक्तव्य (controversial statement) केली आहेत. डॉ. कर्णिक यांनी केलेल्या या वक्तव्याचा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर (Vitthal Rukmini Temple) समितीचे (Vitthal Rukmini Temple Committee) सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करून जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

वरकरी संप्रदायाने शेकडो वर्षांपासून आध्यात्मिकतेचा तसेच समता, प्रेम, शांततेचा संदेश दिला आहे. संतांच्या शिकवणीमुळे समाजात सद्भावना आणि मूल्यांची जपणूक झाली आहे.असे असूनही मुग्धा कर्णिक यांनी संत परंपरा, धार्मिक श्रद्धा व वारकरी संप्रदायाच्या आचार-विचारांविषयी केलेली विधाने समाजात संभ्रम निर्माण करणारी आणि वारकरी भाविकांच्या श्रद्धेला धक्का पोहोचवणारी आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करून यासंदर्भात मंदिर समितीने एक पत्रकही प्रसिद्ध केले आहे.

हेही वाचा – Indian stock market: अमेरिका-इराण शस्त्रसंधीमुळे शेअर बाजारात तुफान तेजी, कोणत्या शेअर्समध्ये झाली वाढ?

अशा विधानांमुळे कर्णिक यांनी सामाजिक सलोखा आणि परस्पर आदराच्या मूल्यांना बाधा आणली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. याप्रकरणी मुग्धा कर्णिक यांनी सार्वजनिकरित्या माफी मागावी, अशी अपेक्षा पत्रकात नमूद केली आहे. वारकरी संप्रदाय आणि संत परंपरेविषयी अशा बेताल वक्तव्ये कदापि सहन केली जाणार नाहीत, अशा लोकांना यापुढे धडा शिकवला जाईल, असा इशाराही औसेकर महाराज यांनी दिला आहे.

हेही पहा – https://www.youtube.com/watch?v=c2_I1iC-6kI

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.