Auto Drivers : आरटीओकडून १,५०० हून अधिक बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई, ६६६ वाहन परवाने निलंबित

72
Auto Drivers : आरटीओकडून १,५०० हून अधिक बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई, ६६६ वाहन परवाने निलंबित
Auto Drivers : आरटीओकडून १,५०० हून अधिक बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई, ६६६ वाहन परवाने निलंबित

मुंबईत सातत्याने लहानमोठ्या वाहनांची धावपळ, रहदारी सुरू असते. समाजात वावरणारा प्रत्येक प्रवासी वर्ग येथे विविध माध्यमातून सतत प्रवास करत असतो. त्यामुळे येथील वाहतूक व्यवस्था कार्यक्षम असणे, ही काळाची गरज आहे, मात्र मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत एका विभागाकडून प्रवाशांना वारंवार त्रासाला सामोरे जावे लागते. यामुळे त्यांना विविध प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळेच आज ही यंत्रणा ढासळली आहे. प्रवाशांशी असभ्य वर्तन, भाडे जास्त घेणे, जवळचे भाडे नाकारणे, प्रवाशांशी अरेरावी करणे, अशा प्रकारे प्रवाशांशी मुजोरपणे वागणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात (Auto Drivers)  प्रादेशिक परिवहन कार्यालयांना (RTO) जुलै महिन्याच्या मध्यापासून १५००हून जास्त तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामुळे ६६६ परवाने निलंबित (permit suspended) करण्यात आले आहेत.

सामायिक रिक्षा मार्ग आणि कॅबमध्ये वाढ यामुळे रिक्षाच्या सेवेत घट होत असली, तरीही आरटीओने आता बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे आता यापुढे प्रवाशांच्या समस्यांकडे लक्ष देण्यावर भर देण्यात येणार आहे.

सध्या काळ्या-पिवळ्या रंगाची टॅक्सी आणि रिक्षा…मुंबईतील ही दोन वाहने सतत चोवीस तास लोकांसाठी उपलब्ध होतात. गृहनिर्माण संस्था, बाजारपेठ, कार्यालये, व्यावसायिक केंद्रे, जवळची ठिकाणे येथे प्रवाशांना घेऊन जाण्यास बहुतांश रिक्षाचालक टाळाटाळ करतात. याबाबत अंधेरी, बोरिवली आणि वडाळा येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयांना (आरटीओ) प्रवाशांकडून त्यांच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाइन नंबर आणि ईमेलवर जुलैच्या मध्यापासून ते 15 ऑक्टोबरपर्यंत १,५१२ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

याबाबत घाटकोपरचे रहिवासी मनप्रीत सिंग यांनी त्यांचा अनुभव प्रसिद्धीमाध्यमांना सांगितला. ते म्हणाले, अनेकदा रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षाचालक प्रवाशांना राइड नाकारतात. अशावेळी प्रवाशांनाही जिथून रिक्षा सहज मिळू शकते, असा मार्ग तयार करा. जवळपास आठ-दहा वर्षांपूर्वी मला माझ्या सोसायटी किंवा ऑफिसच्या बाहेरून सहज कन्व्हेयन्स मिळायचे. आता परिस्थिती बदलली आहे. आज, या स्पॉट्सवर जेमतेम फार तर एक-दोघेजणच दिसतात. बहुतेक रिक्षा चालकांकडे त्यांचे परवाने आहेत की नाही याविषयी माहिती नाही अशी भावना अंधेरी लोखंडवालाचे रहिवासी राज कश्यप म्हणाले. तसेच प्रवाशांकडून सामान्य भाड्याच्या जवळपास दुप्पट जास्त भाडे मागितल्याच्या तक्रारी नागरिकांनी यापूर्वी केल्या आहेत.

प्रवाशांच्या या समस्येबाबत वडाळा आरटीओचे विनय अहिरे यांनी सांगितले की, ३९३ परमिट निलंबित करण्यात आले आहे. हे निलंबन १० ते १५ दिवसांसाठी आहे तसेच १०,२५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Ind vs Pak : अहमदाबादमध्ये कुठली वागणूक पाक क्रिकेट बोर्डाला खटकली? आयसीसीकडे केली तक्रार)

रिक्षाचालकांवर लगाम बसावा यासाठी हेल्पलाईन सुविधा…

भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांवर लगाम बसावा तसेच प्रवाशांकडून इलेक्ट्रॉनिक मीटरनुसार, आरटीओने ठरवून दिलेली रक्कम आकारली जावी, अशी माहिती याबाबत वरिष्ठ परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी दिली आहे. उपनगरातील रिक्षाचालकांवर नवरात्र, दिवाळीसारख्या सणांमध्ये ही कारवाई सुरूच राहाणार असल्याचा इशारा दिला आहे. रिक्षाचालकांच्या मुजोरीविरोधात मुंबई उपनगरातील 9152240303 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर तक्रारी नोंदवता येतील. तक्रारी वडाळा आरटीओला ईमेलही करता येतील. ईमेलसाठी [email protected] यावर संपर्क साधावा. अंधेरी आरटीओला तक्रार करण्यासाठी व्हॉट्सअॅप क्रमांक ९९२०२४०२०२ यावर संपर्क करू शकतात.

६६६ परवाने निलंबित
यामध्ये प्रवाशांना जवळचे भाडे नाकारणे, मीटरने न जाणे, वाहने ओव्हर लोड करणे, कायमस्वरुपी प्रवासी …अशा अनेक कारणांमुळे प्रवाशांना भाडे नाकारतात. काही रिक्षाचालक कार्टलायझेनवर (भाडे वाढवणे) काम करतात, या सर्व समस्यांबाबत आरटीओने तीन महिन्यांपूर्वी विशेष हेल्पलाईन सुरू केली होती. रिक्षाचालकांकडून प्रवाशांना नकार देण्याचे प्रमाण वाढले होते, या सर्व तक्रारींच्या आधारे आरटीओकडून 666 परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.