Doctor Dismissed : सरकारी रुग्णालयात ऑपरेशन थिएटरमध्ये प्री-वेडिंग फोटोशूट करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई

166
Doctor Dismissed : सरकारी रुग्णालयात ऑपरेशन थिएटरमध्ये प्री-वेडिंग फोटोशूट करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई
Doctor Dismissed : सरकारी रुग्णालयात ऑपरेशन थिएटरमध्ये प्री-वेडिंग फोटोशूट करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई

कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात ऑपरेशन थिएटरमध्ये होणाऱ्या पत्नीसोबत प्री-वेडिंग फोटोशूट केल्याप्रकरणी डॉक्टरवर कारवाई (Doctor Dismissed) करण्यात आली. ऑपरेशन थिएटरमध्ये फोटोशूट करणं डॉक्टरला चांगलंच भोवलं आहे.

कर्नाटकातील भरमसागर शासकीय रुग्णालयातील (Bharamsagar Government Hospitals) डॉक्टर अभिषेक यांनी नुकतेच रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये प्री-वेडिंग फोटोशूट केलं. त्याचे व्हिडियो आणि फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले. यामुळे लोकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. रुग्णालयाच्या या व्हायरल झालेल्या व्हिडियोमध्ये डॉ. अभिषेक हे एका रुग्णावर शस्त्रक्रिया करत आहेत आणि त्यांची होणारी पत्नी त्यांच्या समोर उभी राहून त्यांना मदत करत असल्याचे दिसत आहे. शेजारी उभे असलेले इतर सहकारी हसत आहेत. ज्या रुग्णावर शस्त्रक्रिया केली जात आहे तो रुग्ण उठून बसतो आणि जोरात हसायला लागतो. विशेष म्हणजे ज्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे, असे व्हिडियोमध्ये दाखवले आहे, तो खरा रुग्ण नसून रुग्ण असल्याचे नाटक करत आहे.

(हेही वाचा – Amit Shah : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू केला जाईल )

आरोग्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल…
या घटनेची कर्नाटकाचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी शुक्रवारी या डॉक्टरला सेवेतून बडतर्फ केलं असून या प्रकरणाबाबत सांगितले की, सरकारी रुग्णालये ही जनतेची सेवा करण्यासाठी असतात. वैयक्तिक कामांसाठी नसतात. मी अशी अनुशासनात्मकता कधीच खपवून घेणार नाही. इतर कर्मचाऱ्यांनीदेखील यातून बोध घेऊन असे प्रकार करू नयेत.

रुग्णालयातील सर्व डॉक्टर, कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक तत्त्वांनुसार कर्तव्ये पार पाडावी लागतील. सरकारी रुग्णालयांच्या जागेचा गैरवापर करू नये, अशा सूचना संबंधित डॉक्टर आणि अधिकाऱ्यांना यापूर्वीच दिल्या असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.