Accident : पोलिसांच्या वाहनाला भीषण अपघात; २ पोलिसांचा जागीच मृत्यू

110

नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय माहामार्गावर पोलिसांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. शनिवारी रात्री १:३० गस्तीवर असताना, कोसदनी घाटाजवळ एका आयशर ट्रकने महामार्ग पोलिसांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. त्यात पोलिस शिपाई संजय रंगराव नेटके (४१) व ट्रक चालक पांडुरंग हरी नकाते (५०) यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रकने दिलेल्या धडकेत २ पोलिसांचा मृत्यू झाला असून इतर दोन पोलिस शिपाई गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना यवतमाळ येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यास नागपूर येथे हलविण्यात आले आहे. याप्रकरणी, पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून चालकासह ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे. रस्ते अपघातात सध्या संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे यात मृतांची संख्याही वाढत आहे, हे दुर्दैव आहे. सध्या राज्यात रस्ते सुरक्षासाठी सरकार विशेष प्रयत्न करताना दिसत असले तरी अपघातात वाढ होत आहे.

(हेही वाचा Narendra Modi : डुडुळगाव येथील गृहप्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.