आधार कार्डबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय

53

आधार कार्ड ऑनलाईन अपडेट करणाऱ्यांना मोदी सरकारने एक जबरदस्त भेट दिली आहे. येत्या तीन महिन्यांसाठी आधार ऑनलाईन अपडेट करणाऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असे मोदी सरकारकडून बुधवारी सांगण्यात आले. यापूर्वी ५० रुपये द्यावे लागायचे. परंतु, आता आधार कार्डधारकांना ऑनलाईन कागदपत्रे अपलोड करून आधार कार्ड मोफत बनवता येणार आहे. जर तुम्ही ऑफलाईन म्हणजेच आधार केंद्रावर जाऊन आधार अपडेट करत असाल, तर तुम्हाला पूर्वीप्रमाणेच ५० रुपये शुल्क भरणे बंधनकारक असणार आहे.

कधीपर्यंत शुल्क आकारले जाणार नाही

मोदी सरकारच्या निर्णयानुसार १५ मार्च ते १४ जूनपर्यंत आधार कार्ड ऑनलाईन अपडेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार आहे. याचाच अर्थ तुम्ही १४ जूनपर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करू शकणार आहात.

यामुळे घेतला मोदी सरकारने हा निर्णय

प्रत्यक्षता आधार कार्ड जारी होऊन १० वर्ष पूर्ण झाली आहेत. यादम्यान अनेकांचे पत्ते आणि नावे बदलली आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव UIDAIने सर्वांना आधार कार्ड अपडेट करण्यासाठी सूचना केली आहे. तसेच आधार कार्ड ऑनलाईन अपडेटमध्ये वेग वाढण्यासाठी मोदी सरकारकडून ५० रुपये शुल्क तात्पुरत्या स्वरुपात रद्द करण्यात आले आहे.

(हेही वाचा – 31 मार्चपर्यंत आधार कार्ड आणि पॅन कार्ड करा लिंक; अन्यथा…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.