Lalit Patil Drug Case : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात नवा ट्वीस्ट, आता सराफ व्यावसायिक देखील अडकणार?

28
Lalit Patil Drug Case : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात नवा ट्वीस्ट, आता सराफ व्यावसायिक देखील अडकणार?

पुण्यातील ससून रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेलेला ड्रगमाफिया ललित पाटील (Lalit Patil Drug Case) याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तामिळनाडूतील चेन्नई येथे अटक केली. तो २ ऑक्टोबरला रुग्णालयातून पळून गेला होता. गेल्या १५ दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते.

ललिल पाटील (Lalit Patil Drug Case) रुग्णालयातून पळून गेल्यानंतर रुग्णालय प्रशासन आणि येरवडा कारागृह प्रशासन याबाबत अनेक आरोप- प्रत्यारोप होत होते. राजकीय आरोप-प्रत्यारोपांचाही यामध्ये समावेश झाला. यादरम्यान पुणे पोलिसांनी ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांना उत्तर प्रदेश येथून अटक केली. त्या दोघांना २० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

(हेही वाचा – World Cup 2023 : प्रत्येक सामन्यानंतर वाढतेय गुणतालिकेची रंगत, आता पाकिस्तान टॉप ४ मधून बाहेर)

अशातच आता ललित पाटील (Lalit Patil Drug Case) प्रकरणात नवीन अपडेट समोर आली आहे. त्या अपडेटनुसार आता या प्रकरणात एक सराफ व्यावसायिक देखील अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी सराफा व्यावसायिकाची चौकशी होणार आहे. कारण ड्रग्जच्या पैशातून ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील याने या सराफाकडून सोने खरेदी केल्याचे उघडकीस आले आहे.

तब्बल आठ किलोचे सोने खरेदी केले असून यापैकी ३ किलो सोने हस्तगत, उर्वरित ५ किलो सोने (Lalit Patil Drug Case) जप्त करणे बाकी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. हे उर्वरित सोने कुठे लपवले याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. नाशिकच्या कोणत्या सराफाकडून सोने खरेदी केले, याची चौकशी सुरू असून ललित पाटीलचे सराफ व्यावसायिकासोबतचे कनेक्शन उघड होणार आहे. तर आतापर्यंतच्या चौकशीत ललित पाटील (Lalit Patil Drug Case) हा आंतरराज्यातून आंतरराष्ट्रीय पातळीवर ड्रग्सचा विस्तार करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफियांच्या संपर्कात होता, अशी माहिती त्याच्या कॉल रेकॉर्डिंग वरून समोर आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.