Lata Mangeshkar : स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जीवनावर आधारित म्युरल

केम्स कॉर्नर उड्डाणपुलालगत तब्बल ५० फूट लांबीचे उभारले भित्तिशिल्प

388
Lata Mangeshkar : स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जीवनावर आधारित म्युरल

भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या संगीत क्षेत्रातील अमूल्य योगदानावर आधारित ५० फूट लांब आणि १५ फूट उंच आकाराच्या भित्तीशिल्पाचे कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते रविवारी १० मार्च २०२४ रोजी अनावरण करण्यात आले. याप्रसंगी सहायक आयुक्त (डी विभाग) शरद उघडे, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, गायक रुपकुमार राठोड, आदिनाथ मंगेशकर आदी उपस्थित होते. (Lata Mangeshkar)

भित्तीशिल्पासाठी मंगेशकर कुटुंबांचे योगदान

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे भित्तिशिल्प साकारण्याची संकल्पना पालकमंत्री तथा स्थानिक आमदार मंगल प्रभात लोढा यांनी मांडली होती. त्यांच्या संकल्पनेनुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली, महानगरपालिकेच्या डी विभागाने न्यायमूर्ती सीताराम पाटकर मार्गावर केम्प्स उड्डाणपुलालगत हे भित्तिशिल्प साकारले आहे. या भित्तिशिल्पामध्ये दिवंगत लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या संपूर्ण जीवनपट, संगीत क्षेत्रातील त्यांच्या प्रवासाचे विविध टप्पे आदींची कलात्मक पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे. सुमारे ५० फूट लांब व १५ फूट उंच आकाराचे हे भित्तिशिल्प साकारताना त्यासाठी मंगेशकर कुटुंबीयांनीही मोलाचे योगदान दिले आहे. (Lata Mangeshkar)

(हेही वाचा – Mill Workers : गिरणी कामगारांसाठी घरकुल; मुंबई महापालिकेच्या तिजोरीतून १५०० कोटी)

लतादीदींच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी

अनावरणप्रसंगी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, लतादीदींचा सूर या जगात अनंत काळ टिकून राहील, इतके त्यांचे संगीत क्षेत्रातील योगदान मोठे आहे. त्यांच्या कार्याला मानवंदना देण्याच्या उद्देशाने हे भित्तीशिल्प उभारले आहे. पुढील पिढ्यांना या शिल्पाच्या माध्यमातून दिवंगत लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या संगीत प्रवासाची माहिती मिळेल आणि त्यापासून ते प्रेरणा घेतील, अशी भावनाही लोढा यांनी व्यक्त केली. (Lata Mangeshkar)

प्रभूकुंज बाहेर क्यु आर कोड

दरम्यान, या प्रसंगी पुरातन वारसा फलकाचेही (हेरिटेज प्लाक) अनावरण करण्यात आले. क्यू आर कोड आधारित हा फलक भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या ‘प्रभूकुंज’ या निवासस्थानाच्या बाहेर लावण्यात येणार आहे. त्यावरील क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर लता मंगेशकर यांच्या जीवनाविषयीची माहिती, त्यांची गाणी नागरिकांना उपलब्ध होतील. मुंबईतील अनेक पुरातन वारसा (हेरिटेज) असलेल्या वास्तूंविषयीदेखील असे फलक तयार करून विविध ठिकाणी बसविण्यात येतील, अशी माहिती सहायक आयुक्त (डी विभाग) शरद उघडे यांनी यावेळी दिली. (Lata Mangeshkar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.