Drug : ‘मिशन थर्टी डेज’ मुंबईत ७ महिन्यांत ९७५ अमली पदार्थ विक्रते अटक

53

मुंबईला अंमली पदार्थांपासून मुक्त करण्याच्या उद्देशाने मुंबई पोलिसांनी शहरातील अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू करण्यात आली आहे. मागील ७ महिन्यांत मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ९७५ संशयितांवर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षी सात महिन्यांत ही कारवाई केवळ ४०० होती.

शहरातून अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ‘मिशन थर्टी डेज’ मोहीम सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहर पोलिसांना दिले. परिणामी, मोहीम सुरू झाल्याच्या दहा दिवसांत मुंबई पोलिसांनी ३५० जणांना अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा अंतर्गत अटक करण्यात आली होती, तसेच साडेसात कोटी रुपयांचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला होता.

(हेही वाचा Article 370 Hearing In SC : जम्मू आणि काश्मीरला पुन्हा स्वतंत्र राज्याचा दर्जा बहाल करणार – केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिपादन)

मुंबई पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, अंमली पदार्थाशी संबंधित अटकेची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत वाढली आहे. मुंबई अंमली पदार्थ मुक्त करणे हे आमचे ध्येय आहे, असे पोलिस सहआयुक्त (का व सु) सत्यनारायण चौधरी यांनी म्हटले आहे. चौधरी यांनी म्हटले आहे की, अंमली पदार्थांचे सेवन आणि विक्रीत मोठ्या प्रमाणात गुंतलेल्या गुन्हेगारांना अटक करण्यात येत आहे.

मुंबई पोलिसांच्या एक वरिष्ठ अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी पोलिसांनी ७ महिन्यांत १.८९ कोटी रुपयांचा ५०८ किलो गांजा जप्त केला आहे. याशिवाय, पोलिसांनी याच कालावधीत ४६.२७ कोटी रुपयांचे ५५३ किलो अमली पदार्थ जप्त केले आहेत. मुंबई शहरासह उपनगरातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थविरोधी कारवाई सुरू असून मागील सात महिन्यात जवळपास ९७५ जणांना अमली पदार्थ सेवन विक्री आणि तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली असून त्यापैकी ३५ नायजेरियन नागरिक आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.