Mumbai Police : ६०० कंत्राटी पोलीस शिपाई मुंबई पोलीस दलात दाखल, लवकरच दुसरा टप्पा पार पडणार

मुंबई पोलीस दलात ६०० कंत्राटी पोलीस भरती झाले आहे, त्यांना ४ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येत असून लवकरच ते मुंबई पोलीस दलाच्या विविध विभाग आणि पोलीस ठाण्यात कर्तव्यासाठी रुजू होणार आहेत.

102
Mumbai Police : ६०० कंत्राटी पोलीस शिपाई मुंबई पोलीस दलात दाखल, लवकरच दुसरा टप्पा पार पडणार
Mumbai Police : ६०० कंत्राटी पोलीस शिपाई मुंबई पोलीस दलात दाखल, लवकरच दुसरा टप्पा पार पडणार

मुंबई पोलीस दलात ६०० कंत्राटी पोलीस भरती झाले आहे, त्यांना ४ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येत असून लवकरच ते मुंबई पोलीस दलाच्या विविध विभाग आणि पोलीस ठाण्यात कर्तव्यासाठी रुजू होणार आहेत. उर्वरित २४०० कंत्राटी पोलिसांना टप्प्याटप्प्याने भरती करण्यात येणार असल्याची माहिती एका पोलीस आधिकरी यांनी सांगितले. (Mumbai Police)

मुंबई पोलीस दलात अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलीस शिपायाची टंचाई भरून काढण्यासाठी ३ हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्याच्या वतीनं घेण्यात आला होता, त्यासाठी गृहखात्याकडून ३० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई पोलीस दलात कंत्राटी पद्धतीनं भरण्यात आलेल्या पदांवर घेण्यात आलेल्या पोलिसांच्या पगारासाठी ३० कोटींच्या खर्चाला शासनाकडून मंजुरीही देण्यात आली होती. (Mumbai Police)

मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई पदाची सुमारे दहा हजार पदे रिक्त आहे. मुंबई पोलिसांना कमी मनुष्यबळात दैनंदिनी कामे इतर कर्तव्यासाठी अपुरे पडत आहे. नुकत्याच झालेल्या मुंबई पोलिस भरती मधून मुंबई पोलीस दलाला सात हजार पोलीस शिपाई नव्याने मिळणार आहे, त्यानंतर देखील मुंबई पोलीस दलात ३ हजार पोलीस शिपाई पदे रिक्त राहत असल्यामुळे पोलिस शिपाई पदे विहीत मार्गाने भरण्याची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत किमान ११ महिने कालावधीसाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून ३ हजार मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. (Mumbai Police)

(हेही वाचा – H.N Golibar : जाहिरात न घेता साप्ताहिक चालवणारा संपादक एच. एन. गोलीबार)

मुंबई पोलीस दलात कंत्राटी पद्धतीने पोलीस शिपाई भरती करण्याचा पहिला टप्पा पार पडला आहे. पहिल्या टप्पात मुंबई पोलीस दलात महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे ६०० जवानांना भरती करण्यात आले असून त्यांना ४ दिवसांच्या प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे. हे ६०० जवान प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुंबई पोलीस दलात विविध विभागात रुजू होणार आहेत. त्यानंतर भरतीचा दुसरा टप्पा पार पडणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकारी यांनी म्हटले आहे. पोलीस शिपाई पदासाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणाऱ्या जवानांवर महत्वाची कामगिरी सोपविण्यात येणार नसून त्यांना कार्यालयीन कामे, उत्सवादरम्यान बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण, इत्यादी कामासाठी कंत्राटी पोलिसांचा वापर केला जाणार आहे. (Mumbai Police)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.