Nipah virus : केरळमध्ये निपाहचे ६ रुग्ण, दोघांचा मृत्यू

राज्यात विषाणूच्या प्रसाराचे कारण अस्पष्ट

98
Nipah virus : केरळमध्ये निपाहचे ६ रुग्ण, दोघांचा मृत्यू
Nipah virus : केरळमध्ये निपाहचे ६ रुग्ण, दोघांचा मृत्यू

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने म्हटले आहे की निपाह विषाणूमुळे मृत्यूचे प्रमाण ४० – ७०% आहे. करोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या तुलनेत हे प्रमाण जास्त आहे. कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण २-३% आहे. केरळमध्ये निपाह व्हायरस (Nipah virus) का पसरतो याचे कारण स्पष्ट झालेले नाही, असेही आयसीएमआरने म्हटले आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ४ झाली आहे. केरळमध्ये आतापर्यंत निपाहची एकूण ६ प्रकरणे समोर आली असून, त्यात २ जणांचा मृत्यू झाला आहे. केरळच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, मृत व्यक्ती सध्या कोझिकोड येथील रुग्णालयात निरीक्षणाखाली आहे

केरळमध्ये आणखी एक निपाह विषाणूचा संसर्ग आढळून आला आहे. त्यामुळे येथील एकूण बाधितांची संख्या ६ झाली आहे.आमच्याकडे फक्त १० रुग्णांसाठी मोनोक्लोनल अँटीबॉडीजचे डोस आहेत. केरळमध्ये निपाह व्हायरसचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. कोझिकोडमध्ये एका ३९ वर्षीय व्यक्तीला विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सक्रिय रुग्णांची संख्या ४ झाली आहे. संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने तयारी मजबूत केली आहे. कोझिकोडमध्ये ज्या ग्रामपंचायतींचा संसर्ग आढळला आहे त्या ग्रामपंचायतींना क्वारंटाईन झोन घोषित करण्यात आले आहे.

(हेही वाचा : Pet Funeral Facility : पाळीव प्राण्यांसाठीच्या अंत्यविधीची पहिली सुविधा मालाडमध्ये!)

आयसीएमआर चे डीजी राजीव बहल यांच्या मते, त्यांकडे फक्त १० रुग्णांसाठी मोनोक्लोनल अँटीबॉडी डोस आहेत. जेव्हा आपल्या शरीरातील प्रतिपिंड प्रयोगशाळेत तयार केले जातात तेव्हा त्याला मोनोक्लोनल अँटीबॉडी म्हणतात. कॅन्सरसह अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी हे उपयुक्त आहे.बहल म्हणाले की, आम्ही मोनोक्लोनल अँटीबॉडीजचे आणखी २० डोस मागवले आहेत, जेणेकरुन ते रुग्णांना संसर्गाच्या सुरुवातीस देता येतील.मोनोक्लोनल ऍन्टीबॉडीजच्या कार्यक्षमतेची चाचणी केली गेली नाही, फक्त एकच फेज चाचणी पूर्ण झाली आहे.

संक्रमित लोकांच्या संपर्क यादीत ९५० लोकांचा समावेश
मृतांच्या संपर्कात आलेल्या १५ अतिधोकादायक व्यक्तींचे नमुने घेण्यात आले आहेत. आरोग्य अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, संक्रमित लोकांच्या संपर्क यादीत ९५० लोकांचा समावेश आहे. त्यापैकी २१३ लोक उच्च जोखमीच्या श्रेणीत आहेत. २८७ आरोग्य अधिकाऱ्यांचाही संपर्क यादीत समावेश आहे.

हेही पहा  –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.