50th Convocation : मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्सचा ५०वा दीक्षांत समारंभ, ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांची प्रमुख उपस्थिती

118
50th Convocation : मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्सचा ५०वा दीक्षांत समारंभ साजरा, ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांची प्रमुख उपस्थिती

पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्सचा ५०वा दिक्षांत समारंभ शनिवार (३० मार्च) साजरा झाला. यावेळी सुमारे ११०० विद्यार्थ्यांना माहिती-तंत्रज्ञान, वाणिज्य आणि व्यवसाय प्रशासनातील (बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन) पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात आली. अत्यंत उत्साही, उत्तम आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली.

यावेळी ते म्हणाले की, मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्सच्या ५०व्या दीक्षांत समारंभावेळी मला मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले. दीक्षांत समारंभावेळी केलेले नेमके हे माझे ५०वे भाषण आहे. त्यामुळे हा विलक्षण योगायोग आहे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या उदयोन्मुख संधी आणि आव्हाने याविषयी मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील अतिशय हुशार तरुण विद्यार्थ्यांना पाहून आनंद व्यक्त केला तसेच विद्यार्थ्यांना अतिशय दर्जेदार शिक्षण दिले जात असल्याबद्दल विद्यार्थी आणि प्राध्यापकांना शुभेच्छा दिल्या.

(हेही वाचा – Swatantra Veer Savarkar : उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळेंचा सावरकरद्वेष उघड; राहुल गांधींविषयीच्या विधानावरून फडणवीसांना दिले आव्हान)

दीक्षांत समारंभाकरिता आमंत्रित करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी दिल्याबद्दल पार्ले टिळक संस्थेच्या प्राचार्य डॉ. सोनाली पेडणेकर आणि बन्सी धुरंधर सर आणि इतर सहकारी, कर्मचाऱ्यांचे उदय निरगुडकर यांनी मन:पूर्वक आभार मानले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.