Ganja Seized : मुंबई-भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेसमधून ३२ किलो गांजा जप्त

एनडीपीएस कायदा १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

105
Ganja Seized : मुंबई-भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेसमधून ३२ किलो गांजा जप्त
Ganja Seized : मुंबई-भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेसमधून ३२ किलो गांजा जप्त

मुंबई-भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेसमधून (Mumbai-Bhubaneswar Konark Express) दुसऱ्यांदा ३२ किलो गांजा तस्करी करताना पकडला आहे. गेल्या आठवड्यात गाडीतील जनरल डब्याच्या स्वच्छता गृहाजवळ दीड किलो गांजा (Ganja Seized) पकडला होता. गुरुवारी पुन्हा याच गाडीत एका ट्रॉली बॅगमध्ये ३२ किलो गांजा श्वान द्रोणा आणि श्वान पथकातील आरपीएफ (RPF) जवानांनी पकडला आहे.

रेल्वे सुरक्षा बलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, (ट्रेन क्र. ११०२०) कोणार्क एक्सप्रेसच्या मागील जनरल कोच CR २१६१७० मध्ये ०२ ट्रॉली बॅगमध्ये २,४८,०५६ रुपये किमतीचा ३१.०२४ किलो गांजा पकडला. पुणे रेल्वे स्थनकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १वर रात्री सव्वा अकराच्या सुमारास गाडी उभी असताना जनरल कोचमध्ये सीट क्रमांक २१ खाली एक निळ्या रंगाची ट्रॉली बॅग आढळली आणि सीट क्रमांक ४१ खाली एक लाल रंगाची ट्रॉली बॅग सापडली. या २ ट्रॉली बॅगमध्ये श्वान द्रोणाच्या मदतीने गांजा पकडला गेला.

(हेही वाचा – Israeli-Palestinian conflict : भारताने इस्रायलला दिला नैतिक पाठिंबा; काय म्हणाले पंतप्रधान मोदी?)

या घटनेची माहिती मिळताच पुणे विभागाचे सहाय्यक सुरक्षा आयुक्त प्रवीरकुमार दास, निरीक्षक संदीप पवार आणि निरीक्षक बी. एस. रघुवंशी यांनी घटनास्थळी धाव घेतली. सापडलेला गांजा जप्त करून एनडीपीएस कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यासाठी जीआरपी पुणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या प्रकरणी एनडीपीएस कायदा १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.