AIDS : मुंबईत HIV जनजागृतीसाठी ३ नवीन फिरती वाहने

मूलभूत सेवा विभागांतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका, शासकीय रूग्णालये व प्रसूतिगृहात एकूण ५० एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्रे कार्यरत आहेत.

115
AIDS : मुंबईत HIV जनजागृतीसाठी ३ नवीन फिरती वाहने

मुंबई जिल्हे एड्स (AIDS) नियंत्रण संस्थेमार्फत मुंबई महानगरातील प्रामुख्याने झोपडपट्टी व जोखीमप्रवण ठिकाणी एचआयव्ही समूपदेशन व रक्तचाचणी तसेच जनजागृती करण्याकरिता ३ नव्या फिरत्या वाहनांचे लोकार्पण राज्याचे कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते कोंडीविटा अंधेरी स्थित समाज कल्याण केंद्र येथे करण्यात आले. या वाहनांचा उपयोग मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेला एचआयव्ही/गुप्तरोग जनजागृती व चाचणी शिबिरे आयोजित करण्यासाठी होणार आहे. (AIDS)

मुंबई महानगरामध्ये एचआयव्ही/एड्सचे (AIDS) समूळ उच्चाटन करण्यासाठी मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेला मूलभूत सेवासुविधा देण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले आहेत. या अंतर्गत तीन नवीन फिरती वाहने उपलब्ध झाली आहेत. या लोकार्पण कार्यक्रमासाठी सह आयुक्त (परिमंडळ ३) रणजित ढाकणे, उप आयुक्त (परिमंडळ २) तथा प्रकल्प संचालक (मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्था) प्रशांत सपकाळे, सहायक आयुक्त (के पूर्व) मनीष वळंजू आदी उपस्थित होते. (AIDS)

(हेही वाचा – Eastern and Western Expressway Bridges : पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर बांधली जाणार वाहतुकीसाठी तीन भुयारी आणि उड्डाणपुल)

मूलभूत सेवा विभागांतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका, शासकीय रूग्णालये व प्रसूतिगृहात एकूण ५० एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्रे कार्यरत आहेत. मुंबई जिल्हे एड्स (AIDS) नियंत्रण संस्थेकडे नव्याने भर पडलेल्या आणखी तीन फिरत्या वाहनांमुळे वाहनांची एकूण संख्या आता सहा झाली आहे. या संस्थेकडून दरमहा १०० पेक्षा अधिक एचआयव्ही/गुप्तरोग जनजागृती चाचणी शिबिरे आयोजित केली जातात. एचआयव्ही व गुप्तरोग चाचणी करण्यासाठी मुंबई व उपनगरामध्ये अशासकीय संस्थांमार्फत दररोज एचआयव्ही/एड्स (AIDS) तपासणी शिबिरे भरविण्यात येतात. मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेच्या गतवर्षीच्या आकडेवारीनुसार ट्रकचालक, क्लिनर व स्थलांतरित कामगार या जोखीम प्रवण गटांकरिता एकूण ४६ हजार ९५८ इतक्या गुप्तरोग व एचआयव्हीच्या चाचण्या या फिरत्या वाहनांच्या माध्यमातून झालेल्या शिबिरांमार्फत करण्यात आल्या आहेत. (AIDS)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.