Truck drivers strike: राज्यात ट्रक चालकांचा ३ दिवसीय संप, अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलची टंचाई

ट्रकचालकांच्या देशव्यापी संपाचा फटका पेट्रोल-डिझेलला बसला आहे.

219
Truck drivers strike: राज्यात ट्रक चालकांचा ३ दिवसीय संप, अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलची टंचाई
Truck drivers strike: राज्यात ट्रक चालकांचा ३ दिवसीय संप, अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलची टंचाई

राज्यातील ट्रक चालकांनी ३ दिवसीय संप (Truck drivers strike) पुकारला आहे. त्यामुळे संपाच्या दुसऱ्या दिवशी राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे. त्याच वेळी संपात फूट पडली असली तरीही राज्यातील इतर ठिकाणी संप सुरूच आहे.

सरकारकडून नवीन मोटार वाहन कायदा आणला जात आहे. या कायद्यास देशभरातील ट्रकचालकांनी विरोध करत १ जानेवारीपासून संप सुरू केला आहे. पहिल्या दिवशी राज्यातील ट्रकचालकही या संपात सहभागी झाले होते.

पुणे शहरात ट्रकचालकांनी संप कायम ठेवला आहे. सोलापुरात पेट्रोलपंपावर सकाळपासून वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. पेट्रोल पंप बंद असल्याच्या चर्चेने सोमवारी रात्रीपासून नागरिकांच्या मोठ्या रांगा पेट्रोलपंपावर लागल्या आहेत.

(हेही वाचा – Ind vs SA 2nd Test : भारतीय संघ दुसऱ्या कसोटीसाठी केपटाऊनला पोहोचला तो क्षण )

पेट्रोल-डिझेलचा तुटवडा…

ट्रकचालकांच्या देशव्यापी संपाचा फटका पेट्रोल-डिझेलला बसला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सर्वच पेट्रोलपंपावर मंगळवारी सकाळपासूनच पेट्रोल-डिझेल नाही, असे फलक लावले आहेत. सोमवारपासून संपामुळे पेट्रोल-डिझेलचे टँकर न आल्याने पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे.

मनमाडमध्ये वाहतूक ठप्प…
मनमाडच्या पानेवाडीत पेट्रोल-डिझेल वाहतूक ठप्प झाली आहे. मनमाडमध्ये पुरवठा कंपनीची चालक आपल्या संपावर ठाम आहेत. धाराशिवमध्ये मंगळवारी सकाळपासून पेट्रोल-डिझेल पंपावर वाहन धारकांच्या रांगा लागल्या आहेत. नागरिक गाडीप्रमाणे बाटलीत तसेच कॅनमध्ये पेट्रोल भरून साठा करत आहेत. आपत्कालीन सेवा, रुग्णवाहिका, पोलीस यासाठी साठा राखीव असणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.