Nagpur Patients : नागपूरच्या रुग्णालयांत 24 तासांत 25 मृत्यू नाही; अधिष्ठात्यांनी स्पष्ट केली वस्तुस्थिती   

71
Nagpur Patients : नागपूरच्या रुग्णालयांत 24 तासांत 25 मृत्यू नाही; अधिष्ठात्यांनी स्पष्ट केली वस्तुस्थिती   
Nagpur Patients : नागपूरच्या रुग्णालयांत 24 तासांत 25 मृत्यू नाही; अधिष्ठात्यांनी स्पष्ट केली वस्तुस्थिती   

नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. (Nagpur Patients) यानंतर आता नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी महाविद्यालय (मेयो) हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतही २४ तासांत २५ मृत्यू झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. या बातमीने राज्यात पुन्हा हळहळ व्यक्त झाली. वस्तुस्थिती अशी नसून मेयो आणि मेडिकलमध्ये केवळ अत्यवस्थ आणि व्हेंटीलिटरवरील रूग्ण मृत्युमुखी पडत आहेत. दिवसाला ५ ते ६ रुग्णांचे मृत्यू होत असल्याची माहिती मेयोचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सागर पांडे आणि मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. शरद कुचेवार यांनी दिली. (Nagpur Patients)

(हेही वाचा – Land for Job Scam : न्यायालयाचा मोठा निर्णय; लालू यादव, राबडीदेवी आणि तेजस्वी यादव यांना जामीन)

मेडिकल आणि मेयो या दोन्ही रुग्णालयांमध्ये काही औषधे रुग्णांना बाहेरून आणायला लावली जात असली, तरी राज्यातील इतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांच्या तुलनेत येथे औषधांचा ३ महिने पुरेल एवढा साठा आहे. सर्पदंशासाठी आवश्यक इंजेक्शनसह इतर काही औषधांचाही वर्षभर पुरेल एवढा साठा असल्याची माहिती प्रशासनाने दिली. (Nagpur Patients)

विष पिणे, हृदयविकार, आत्महत्येचा प्रयत्न, खूनाचा प्रयत्न असे रूग्ण शेवटच्या क्षणी मेयो आणि मेडिकल रुग्णालयात येतात. त्यांच्या जगण्याची शक्यताही कमी असते. शर्थीच्या प्रयत्नानंतरही हे रूग्ण दगावतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या निरीक्षणानुसार १ हजार खाटांमध्ये ६ ते ८ मृत्यू होणे सामान्य आहे, असे डाॅ. पांडे यांनी सांगितले.

मेडिकल आणि मेयो या दोन्ही रुग्णालयांवर विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यातीलही अत्यवस्थ रुग्णांचा भार आहे. या रुग्णांसाठी मेडिकलला १ हजार ४०१ अधिकृत तर ट्रामा व अतिरिक्त मिळून एकूण सुमारे १,८०० खाटा आहेत. मेयो रुग्णालयात ८२२ खाटा आहेत. दोन्ही रुग्णालयांत रोज सुमारे दीड हजार रुग्ण दाखल होऊन उपचार घेतात. खासगी रुग्णालये त्यांच्याकडील रूग्णांना शेवटच्या क्षणी त्यांना मेडिकल-मेयोत हलवतात.  (Nagpur Patients)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.