Agriculture News : १३ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना मिळणार ‘पी एम किसान’ आणि ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेचा लाभ

‘पी एम किसान’ योजनेचा पुढील हप्ता तसेच ‘नमो किसान महासन्मान’ योजनेचा पहिला हप्ता देण्याच्या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे तसेच अन्य अटींची पूर्तता करण्यासाठी ऑगस्ट महिन्यापासून विशेष मोहीम राज्य शासनामार्फत राबविण्यात येत होती.

27
Agriculture News : १३ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना मिळणार ‘पी एम किसान’ आणि ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेचा लाभ
Agriculture News : १३ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना मिळणार ‘पी एम किसान’ आणि ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेचा लाभ

राज्यातील १३ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना ‘पी एम किसान’ आणि ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी बुधवारी दिली. (Agriculture News)

‘पी एम किसान’ योजनेचा पुढील हप्ता तसेच ‘नमो किसान महासन्मान’ योजनेचा पहिला हप्ता देण्याच्या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे तसेच अन्य अटींची पूर्तता करण्यासाठी ऑगस्ट महिन्यापासून विशेष मोहीम राज्य शासनामार्फत राबविण्यात येत होती. या मोहिमेद्वारे राज्यातील १३ लाख ४५ हजार शेतकरी पात्र ठरले आहेत. (Agriculture News)

‘पी एम किसान’ योजना नव्याने सुरू करण्यात आली, त्यावेळी राज्यातील सुमारे १ कोटी १९ लाख शेतकऱ्यांनी या योजनेत नोंदणी केली होती. त्यांपैकी सुमारे ९५ लाख शेतकरी पात्र ठरले. मात्र, अटींची पूर्तता न केल्याने १३ व्या आणि १४ व्या हप्त्यात त्यापैकी ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना ‘पी एम किसान’चा प्रत्यक्ष लाभ मिळाला. उर्वरित शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ घेता आला नाही. (Agriculture News)

९५ लाखांपैकी मृत, कर भरणारे व इतर कारणांनी रद्द करून ९२.८७ लाख शेतकरी पात्र ठरत आहेत. त्यापैकी ८२.५९ लाख शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झालेले होते. विविध कारणांनी लाखो लाभार्थी वंचित राहिल्याने कृषीमंत्र्यांमार्फत विशेष मोहीम मंत्री मुंडे यांच्या पुढाकारातून कृषी विभागाने हाती घेतल्यानंतर ग्राम पंचायत पदाधिकारी, कृषीमित्र, यासह कर्मचाऱ्यांनी शिबिरे घेत आणि बांधावर जात १३ लाख ४५ हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण, बँक खाते संलग्न करणे, भूमी अभिलेख नोंदी पूर्ण करून अद्ययावत करून घेणे या अटींची पूर्तता करून घेतली. (Agriculture News)

(हेही वाचा – Israeal-Hamas Conflict: मानवतावादी समस्यांकडे लक्ष द्या, इस्रायल-हमास युद्धाविषयी भारताच्या प्रतिनिधींची स्पष्ट भूमिका)

यामध्ये ९.५८ लाख शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे, २.५८ लाख शेतकऱ्यांचे खाते आधार संलग्न करणे, १.२९ लाख शेतकऱ्यांचे भूमिअभिलेख नोंदी अद्ययावत करणे बाबत कामकाज पूर्ण झाले आहे. ई-केवायसीची अट आता अनिवार्य करण्यात आल्याने ही विशेष मोहीम राबवून याबाबत मंत्री मुंडे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने या कामाला गती प्राप्त झाली. (Agriculture News)

मोदींच्या हस्ते पहिल्या हप्त्याचे वितरण होणार

राज्य शासनाने घोषित केलेल्या ‘नमो किसान महासन्मान’ योजनेतून राज्यातील सुमारे ८६ लाख शेतकऱ्यांना २ हजार रुपयांप्रमाणे पहिल्या हप्त्याचे गुरुवारी (दि.२६) रोजी शिर्डी (जि.अहमदनगर) येथे होणाऱ्या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका क्लिकवर वितरण करण्यात येणार असून यासाठी कृषी विभागाने १७२० कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती कृषी मंत्री मुंडे यांनी दिली आहे. (Agriculture News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.