Israeal-Hamas Conflict: मानवतावादी समस्यांकडे लक्ष द्या, इस्रायल-हमास युद्धाविषयी भारताच्या प्रतिनिधींची स्पष्ट भूमिका

या युद्धामुळे दोन्ही देशांतील नागरिकांचा बळी गेला

76
Israeal-Hamas Conflict: मानवतावादी समस्यांकडे लक्ष द्या, इस्रायल-हमास युद्धाविषयी भारताच्या प्रतिनिधींची स्पष्ट भूमिका
Israeal-Hamas Conflict: मानवतावादी समस्यांकडे लक्ष द्या, इस्रायल-हमास युद्धाविषयी भारताच्या प्रतिनिधींची स्पष्ट भूमिका

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध (Israeal-Hamas Conflict) गेल्या १९ दिवसांपासून सुरू आहे. या युद्धामुळे दोन्ही देशांचे एकमेकांवर होणारे हल्ले, क्षेपणास्त्रांचा वर्षाव आणि विजेच्या अभावामुळे येथील रुग्णालये बंद ठेवण्याची वेळ आली आहे. या युद्धामुळे दोन्ही देशांतील नागरिकांचा बळी गेला. युद्धामुळे अनेकांना मानवतावादी सुविधाही मिळत नाही. या प्रकरणात भारताचे (India) प्रतिनिधी आर. रविंद्र यांनी भारताची बाजू स्पष्ट केली आहे.

यावेळी आर. रविंद्र म्हणाले की, इस्त्रायल आणि हमास यांच्यात चालू असलेल्या युद्धात नागरिकांचा मृत्यू होणं ही चिंतेची बाब आहे. सर्व पक्षांनी नागरिकांचं विशेषत: महिला आणि मुलांचं संरक्षण केलं पाहिजे. मानवतावादी समस्यांकडे  (humanitarian issues) लक्ष दिलं पाहिजे.

(हेही वाचा – IT Pay Hike : एचसीएल टेक आणि इन्फोसिस दिवाळीनंतर देणार कर्मचाऱ्यांना पगार वाढ)

गाझा पट्टीतील नागरिकांसाठी भारताकडून ३८ टन साहित्य पाठवले असल्याची माहिती देत ते म्हणाले की, इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील द्विपक्षीय संबंध सुधारण्याकरिता भारताचं समर्थन आहे तसेच आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना पाठिंबा असून दोन्ही देशांच्या समस्यांच्या निराकरणासाठी भारत वचनबद्ध आहे, असेही ते म्हणाले.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.