कोकणातील १२ अतिरिक्त गणपती विशेष ट्रेन मंगळुरू जंक्शनपर्यंत धावणार

106

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे, लोकमान्य टिळक टर्मिनस – ठोकूर – मंगळुरु जंक्शन दरम्यान १२ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालविणार आहे.

( हेही वाचा : सदोष बायोमॅट्रीक : हजेरीची नोंद न झाल्याने महापालिका कामगारांच्या पगारालाच कात्री)

लोकमान्य टिळक टर्मिनस – ठोकूर – मंगळुरु जंक्शन दरम्यान १२ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या

  • 01153 ही विशेष गाडी दिनांक २८ ऑगस्ट २०२२ ते ३ सप्टेंबर २०२२ पर्यंत (६ सेवा) लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २२.१५ वाजता सुटलेली ट्रेन मंगळुरु जंक्शनपर्यंत विस्तारीत करण्यात येईल आणि दुसऱ्या दिवशी १७.०५ वाजता पोहोचेल. (३१ ऑगस्टची ट्रेन वगळून)
  • 01154 ही विशेष गाडी दिनांक २९ ऑगस्ट २०२२ ते ४ सप्टेंबर २०२२ (६ सेवा) पर्यंत मंगळुरु जंक्शन येथून १८.४५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १३.२५ वाजता पोहोचेल. ( १ सप्टेंबरची ट्रेन वगळून)
  • गाड्यांचे थांबे आणि संरचना सारखीच राहील
  • ३१ ऑगस्ट २०२२ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणारी 01153 विशेष ठोकूर पर्यंत धावेल.
  • १ सप्टेंबर २०२२ रोजी 01154 ही विशेष ठोकूर येथून सुटेल.

रेल्वेचे आवाहन

आरक्षण: प्रवासी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर विशेष शुल्कासह मंगळुरू जंक्शनपर्यंत तिकीट बुक करू शकतात. या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा, असे आवाहन रेल्वेने केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.