सदोष बायोमॅट्रीक : हजेरीची नोंद न झाल्याने महापालिका कामगारांच्या पगारालाच कात्री

106

मुंबई महानगरपालिकेने काही कोटी खर्च करून वेगवेगळ्या कंपन्यांच्या बायोमॅट्रीक हजेरी मशिन बसवल्या. परंतु मशिन वारंवार बंद पडत असल्यामुळे तसेच इंटरनेट सुविधा नसल्यामुळे कामगार, कर्मचाऱ्यांनी सेवा बजावूनही त्या दिवसाचा पगार कापला जात असून यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या खात्यात कमी पगार जमा झाल्याचा आरोप पगार आरोप म्युनिसिपल मजदूर युनियनचे कार्याध्यक्ष अशोक जाधव यांनी केला आहे.

( हेही वाचा : ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवासाची सुविधा सुरू; ‘या’ तारखेपूर्वी आरक्षण केलेल्या प्रवाशांना मिळणार परतावा )

कर्मचाऱ्यांच्या खात्यात कमी पगार जमा झाल्याचा आरोप

महानगरपालिकेच्या विविध खात्यांमध्ये तसेच विभागांमध्ये दर दिवसाची हजेरी घेण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांच्या बायोमॅट्रीक हजेरी मशिन घेतल्या गेल्या. २० कामगारांच्या मागे १ मशिन देण्याचे पालिका प्रशासनाने ठरविले होते. तसे आदेशही प्रशासनाने काढले. परंतू आजच्या घडीला काही हजेरी ठिकाणांवर (चौंकीवर) ७०-८० कामगारांसाठी फक्त १ मशिन उपलब्ध आहे. पण ती मशिनही बंद पडली. तर कामगारांना दूरवर असलेल्या मशिनकडे पळावे लागत आहे. बायोमॅट्रीक मशिनवर हजेरी नोंदवण्यासाठी जाणाऱ्या कामगार,कर्मचारी गेल्यास हमखास इंटरनेट सेवा नसल्याने, मागील ३ वर्षांमध्ये जवळपास २५ लाख एएनएम झाले आहेत. याचाच अर्थ कामगारांनी सेवा बजावल्यानंतरही इंटरनेट सुविधा अभावी हजेरी न नोंदवली गेल्याने त्यांचे खाडे नोंदवले गेले आहे. त्यामुळे प्रत्येक कामगारांचे २०-२५ हजार रुपये कापले गेले आहेत. त्यामुळे ऐन गणपती सणाच्यावेळी हजारो कामगारांचे पगार हे शून्य रुपये आलेले आहेत. पगार न आल्याने कामगारांच्या मनामध्ये फारच असंतोष पसरला असल्याचे म्युनिसिपल मजदूर युनियनचे कार्याध्यक्ष अशोक जाधव यांनी म्हटले आहे.

गणपती सण लक्षात घेऊन कामगारांना पूर्ण पगार द्यावा म्हणून म्युनिसिपल मजदूर युनियनचे सरचिटणीस वामन कविस्कर, कार्याध्यक्ष अशोक जाधव आणि सहा सरचिटणीस प्रफुल्लता दळवी यांनी अतिरिक्त आयुक्त (शहर) आशिष कुमार शर्मा यांची भेट घेतली आणि एएनएम झालेल्या कामगारांचे पूर्ण पगार त्यांच्या खात्यात जमा करावे अशी विनंती केली. अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा यांनीही विनंती मान्य केली असून त्याबद्दल त्यांचे आभारही अशोक जाधव यांनी मानले.

पूर्वीप्रमाणेच हजेरी मस्टरवर हजेरी घेण्यात यावी

जर का काम करून सदोष बायोमॅट्रीक मशिनमुळे कामगारांचे खाडे होत असतील, कामगारांचे हजारो रुपये कापले जात असतील तर अशा मशिनवर हजेरी लावण्याची सक्ती न करता पूर्वीप्रमाणेच हजेरी मस्टरवर हजेरी घेण्यात यावी अशी मागणी अशोक जाधव यांनी केली आहे. जर का बायोमॅट्रीक मशिनवर कामगार अधिकारी यांची हजेली लावलीच पाहिजे हा मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा हट्ट असेल, तर राज्य सरकारप्रमाणे किमान पगाराशी तरी बायोमॅट्रीक हजेरी जोडू नये, अशी मागणी अशोक जाधव यांनी केली आहे. पालिका प्रशासनाने चर्चा करून मार्ग काढला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा म्युनिसिपल मजदूर युनियनचे सरचिटणीस वामन कविस्कर आणि कार्याध्यक्ष अशोक जाधव यांनी दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.