100th Natya Sammelan : नवीन नाटकांमध्ये आजचे सामजिक बदल प्रतिबिंबित झाले पाहिजे; परिसंवादात मान्यवरांचा सूर

100th Natya Sammelan : नवीन लेखकांनी नाटकांमध्ये नावीन्यपूर्ण विषय आणले पाहिजे, त्यामध्ये आजचे सामजिक बदल प्रतिबिंबित झाले पाहिजे असा सूर शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या परिसंवादात उमटला.

136
100th Natya Sammelan : नवीन नाटकांमध्ये आजचे सामजिक बदल प्रतिबिंबित झाले पाहिजे; परिसंवादात मान्यवरांचा सूर
100th Natya Sammelan : नवीन नाटकांमध्ये आजचे सामजिक बदल प्रतिबिंबित झाले पाहिजे; परिसंवादात मान्यवरांचा सूर

बदलत्या सामाजिक परिस्थितीचा परिणाम अनेक घटकांवर होत आहे. परिणामी मराठी नाटकांना आज प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी होत आहे. (100th Natya Sammelan) नाटकं हे अतिशय प्रभावी माध्यम आहे, नवीन लेखकांनी नाटकांमध्ये नावीन्यपूर्ण विषय आणले पाहिजे, त्यामध्ये आजचे सामजिक बदल प्रतिबिंबित झाले पाहिजे असा सूर आजच्या परिसंवादात उमटला. (Marathi Drama)

(हेही वाचा – Shri Ram Mandir : अयोध्येत बाळासाहेब ठाकरेंचाही सन्मान व्हावा याकरता मनसेने केली ‘ही’ मागणी )

नाटक माझ्या चष्म्यातून परिसंवाद 

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या (Akhil Bharatiy Marathi Natya Samelan) शुभारंभ सोहळ्या निमित्त “नाटक माझ्या चष्म्यातून” हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यामध्ये खासदार श्रीनिवास पाटील (Srinivas Patil), सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, माजी आमदार उल्हासदादा पवार,सामाजिक कार्यकर्ते युवराज शहा, पुणे ग्रामीण पोलीस सहअधीक्षक मितेश घट्टे सहभागी झाले होते. त्यांच्याशी राजेश दामले यांनी संवाद साधला.

नाटकांमध्ये नावीन्यपूर्ण विषय आणावे

खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, ”मराठी नाटकांना मोठी परंपरा आहे. अनेक नाटकांनी सामजिक परिवर्तनात मोलाची भूमिका बजावली आहे. आज नवीन लेखकांनी नाटकांमध्ये नावीन्यपूर्ण विषय आणले पाहिजेत, त्या शिवाय प्रेक्षक वाढणार नाही.”

माजी आमदार उल्हास पवार म्हणाले, ”मामा वरेरकर (Mama Varerkar) यांनी ८० वर्षांपूर्वी आपल्या नाटकातून मांडलेले प्रश्न आजही कायम आहेत. नाटकं हे परिवर्तनाचे माध्यम आहे, त्यात सातत्याने प्रयोग झाले पाहिजे, त्या शिवाय प्रेक्षक पुन्हा नाटकाकडे वळणार नाहीत याचा लेखकांनी विचार केला पाहिजे.”

(हेही वाचा – Fake SBI Branch : आता बॅंकही डुप्लीकेट; तमिळनाडूमध्ये उघडकीस आले धक्कादायक कृत्य)

सामजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Trupti Desai) म्हणाल्या, ”मी शाळा, कॉलेज मध्ये असताना अनेक नाटकांमध्ये भूमिका केल्या आहेत. नाटक हे समाजाचा अविभाज्य अंग आहे.”

पुणे ग्रामीण पोलीस सहअधीक्षक मितेश घट्टे म्हणाले, मनोरंजनाबरोबरच सामजिक बदल टिपणारे माध्यम म्हणजे नाटक आहे. माणूसपण आणि माणुसकी जपणारी नाटके लिहिली जावीत.

युवराज शहा म्हणाले, ”मराठी नाटकांनी कायम सामजिक परिवर्तन केले आहे.आजही त्यात चांगले प्रयोग होत आहेत, त्याला आर्थिक पाठबळ मिळाले पाहिजे.” (100th Natya Sammelan)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.