AC Local on Central Railway : येत्या सोमवारपासून मध्य रेल्वेवर आणखी १० वातानुकूलित लोकल धावणार

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील एकूण उपनगरी सेवांची संख्या १८१० राहील. या १० सेवांपैकी एक सकाळची आणि एक संध्याकाळची गर्दीच्या वेळी असेल.

24
AC Local on Central Railway : येत्या सोमवारपासून मध्य रेल्वेवर आणखी १० वातानुकूलित लोकल धावणार
AC Local on Central Railway : येत्या सोमवारपासून मध्य रेल्वेवर आणखी १० वातानुकूलित लोकल धावणार

मध्य रेल्वेने येत्या सोमवारी ६ नोव्हेंबर २०२३ पासून सामान्य (नॉन-एसी) सेवा बदलून आणखी १० वातानुकूलित लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. (AC Local on Central Railway) त्यामुळे वातानुकूलित लोकल सेवेची एकूण संख्या दररोज ६६ होणार आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील एकूण उपनगरी सेवांची संख्या १८१० राहील. या १० सेवांपैकी एक सकाळची आणि एक संध्याकाळची गर्दीच्या वेळी असेल. या वातानुकूलित लोकल सोमवार ते शनिवार या कालावधीत धावतील आणि रविवार आणि नामांकित सुट्टीच्या दिवशी चालणार नाहीत. (AC Local on Central Railway)

(हेही वाचा – Maratha Reservation : सरकारचा निर्णय मान्य नाही; मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा)

अशाप्रकारे आहे वातानुकूलित रेल्वेचे वेळापत्रक

– छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस धिमी लोकल कल्याण येथून ०७.१६वाजता सुटेल आणि ०८.४५ वाजता पोहोचेल.

– कल्याण धिमी लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०८.४९ वाजता सुटेल आणि १०.१८ वाजता पोहोचेल.

– छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस धिमी लोकल कल्याण येथून १०.२५ वाजता सुटेल आणि ११.५४ वाजता पोहोचेल.

– अंबरनाथ धिमी लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ११.५८ वाजता सुटेल आणि १३.४४ वाजता पोहोचेल.

-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस धिमी लोकल अंबरनाथ येथून १४.०० वाजता सुटेल आणि १५.४७ वाजता पोहोचेल.

– डोंबिवली धिमी लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १६.०१ वाजता सुटेल आणि १७.२० वाजता पोहोचेल. (AC Local on Central Railway)

– परळ धिमी लोकल डोंबिवली येथून १७.३२ वाजता सुटेल आणि १८.३८ वाजता पोहोचेल.

– कल्याण धिमी लोकल परळ येथून १८.४० वाजता सुटेल आणि १९.५४ वाजता पोहोचेल.

– परळ धिमी लोकल कल्याण येथून २०.१० वाजता सुटेल आणि २१.२५ वाजता पोहोचेल

– कल्याण धिमी लोकल परळ येथून २१.३९ वाजता सुटेल आणि २२.५३ वाजता पोहोचेल. (AC Local on Central Railway)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.