सरकारी नोकरीच्या परीक्षा शुल्क कपातीसाठी लढा देणार; Anil Parab यांची ग्वाही

123
मुंबईत मराठी लोकांसाठी ५० टक्के घरे आरक्षित ठेवा; Anil Parab यांची मागणी

राज्य सरकारच्या विविध विभागांच्या वर्षातील सर्व परीक्षांसाठीचे एकरकमी पद्धतीने शुल्क घ्यावे. तसेच सध्याच्या परीक्षा शुल्कात कपात करावी यासाठी आपण पदवीधर आमदार म्हणून जोरदार लढा देऊ, अशी ठाम ग्वाही विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ॲड. अनिल परब (Anil Parab) यांनी नुकतीच भायखळा येथे आयोजित शिवसेना पक्षनेते आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिली. (Anil Parab)

यावेळी बोलताना ॲड. परब (Anil Parab) म्हणाले की, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत बेरोजगारी सर्वात मोठी समस्या असल्याचे अधोरेखित झाले. तरुण आणि पदवीधर सरकारी नोकऱ्या प्राप्त करण्यासाठी विविध परीक्षांना बसतात. त्यासाठी ते अनेक परीक्षांचे अर्ज सादर करतात. या परीक्षांमध्ये एमपीएससी, आरोग्य, पोलीस, महसूल, वन, महानगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्था अशा विभागांचा समावेश असतो. प्रत्येक परीक्षेसाठी सरकार किमान एक हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारते. एक पदवीधर दरवर्षी अनेक परीक्षांना बसतो. परिणामी विद्यार्थ्यांवर आर्थिक भार पडतो. (Anil Parab)

(हेही वाचा – Gokhale Road Brige : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोखले पूल यांची जोडणी करण्यात यश; १ जुलै पासून वाहतूक खुली)

परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या पदवीधरांसाठी ‘हेल्प डेस्क’ करणार स्थापित

पदवीधरांसाठी परीक्षा शुल्क कमी करण्याबरोबरच राज्य सरकारच्या सर्व नोकऱ्यांसाठी एकरकमी वार्षिक परीक्षा शुल्क लागू करण्यासाठी मी लढा देईन. या पद्धतीमुळे पदवीधरांना वर्षभरात होणाऱ्या सर्व परीक्षांना बसण्यास मिळणार आहे. या पद्धतीमुळे परीक्षा शुल्क विविध मार्गांनी भरण्याची विद्यार्थ्यांना कटकट राहणार नाही. परीक्षा शुल्क अदा न केल्याने परीक्षेपासून वंचित राहण्याची भीती राहणार नाही. तसेच परीक्षार्थींच्या शुल्कात मोठी बचत होईल, असा दावा ॲड. परब यांनी केला आहे. (Anil Parab)

दरम्यान, मुंबई उपनगरात बाळासाहेब ठाकरे आयएएस अकादमीची एक शाखा सुरू करण्याचा मानस आहे. यामुळे मराठी पदवीधरांना नागरी सेवा परीक्षा देण्यास मार्गदर्शनाची सुविधा मिळणार आहे. मुंबईतील पदवीधरांना रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध होण्यासाठी आंतरराष्ट्रीय रोजगार-शिक्षण मेळावे दरवर्षी आयोजित करण्यात येतील. परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या पदवीधरांना प्रवेश, व्हिसा, नोकऱ्या, अभ्यासक्रम, समुपदेशन आदींविषयी सहाय्य करण्यासाठी ‘हेल्प डेस्क’ स्थापित केला जाणार असल्याचे ॲड. अनिल परब यांनी जाहीर केले. यावेळी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत उपस्थित होते. (Anil Parab)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.