Navaneet Rana यांची उमेदवारी धोक्यात का आली?

221
Navaneet Rana यांची उमेदवारी धोक्यात का आली?
Navaneet Rana यांची उमेदवारी धोक्यात का आली?

खासदार नवनीत राणा (Navaneet Rana) आणि आमदार रवी राणा या दांपत्याच्या अहंकारामुळे नवनीत राणा यांची उमेदवारी धोक्यात आल्याचे बोलले जात आहे. नवनीत (Navaneet Rana) यांचे नाव अमरावती (Amaravati) लोकसभा मतदार संघासाठी जवळपास निश्चित झाले होते आणि त्यांनी निवडणूक प्रचारही सुरू केला होता. मात्र एका प्रचाराच्या (election campaign) भाषणात केलेल्या उद्धट वक्तव्यामुळे राणा दाम्पत्य अडचणीत आले. (Navaneet Rana)

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024 :  उद्धव ठाकरे विदर्भातील जागा काँग्रेसला विकतात; शिंदे गटाच्या आमदाराचा आरोप )

गेल्या काही दिवसांपासून नवनीत राणा (Navaneet Rana) यांनी स्वतःचा प्रचारही बंद केल्याचे बोलले जात आहे. ज्या प्रचारफेरीसाठी मोठा ट्रक सजवला होता तोदेखील एकाच जागी उभा आहे. (Navaneet Rana)

नाराजांची समजूत काढण्याऐवजी अपमान

यांची सुरुवात १५ दिवसांपूर्वी झाली. नवनीत राणा (Navaneet Rana) यांना लोकसभेचे तिकीट जवळपास निश्चित झाले होते. त्यानंतर त्याला माजी मंत्री, आमदार बच्चू कडू आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते, माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी आक्षेप घेतला. मात्र राणा दांपत्याने नारज झालेल्या कडू आणि अडसूळ यांची समजूत काढण्याऐवजी एका प्रचारफेरी दरम्यान ‘ज्यांनी विरोध केला त्यांना या स्टेजवर येऊन नवनीत राणा यांचा प्रचार (election campaign) करावाच लागेल’ अशा शब्दात अपमान करत आपला अहंकार दाखवला. (Navaneet Rana)

(हेही वाचा- National Kho Kho Championship 2024 : राष्ट्रीय खोखो अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर )

चक्र फिरली, प्रतीक्षा वाढली

त्यानंतर चक्र फिरली आणि राणा दाम्पत्याचे नाव उमेदवार यादीत प्रतीक्षेत गेले. अमरावती (Amaravati) या मतदार संघाची उमेदवारी भाजपाने अद्याप जाहीर केली नाही. आता त्यांचे तिकीट कापले जाणार अशी चर्चाही होऊ लागली आहे. २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकीत नवनीत राणा या अपक्ष म्हणून निवडून आल्या असून यावेळी त्यांचे नाव भाजपा ( BJP), शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस (अजित पवार) यांच्या महायुतीकडून जवळपास अंतिम झाले होते आणि त्या भाजपाच्या ( BJP) निवडणूक चिन्हावर लढणार अशी चर्चा होती. ‘भाजपाच्या उमेदवार’ अशा आशयाचे पोस्टर्स आणि बनर्सदेखील तयार केल्याचे समजते. मात्र रवी राणा यांच्या अहंकारी भाषणाने त्यांच्या पत्नीची उमेदवारी धोक्यात आली आहे. (Navaneet Rana)

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024 : धर्म, जातीपातीत फूट पाडून, कुणी राजकारण केले…राम सातपुतेंचे प्रणिती शिंदेंना उत्तर)

बच्चू कडू आक्रमक

महायुतीचे घटक पक्ष प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी तेव्हापासून राणा दांपत्याच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. कडू यांनी महायुतीविरोधात आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्याची भाषा सुरू केली असून राणा यांना हे प्रकरण कठीण जाणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. (Navaneet Rana)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.